Farming Business Idea: या झाडाची शेती केली तर आपण नक्कीच लखपती होणार; वाचा याविषयी सविस्तर

अहमदनगर Live24 टीम, 12 एप्रिल 2022 Krushi news  :-  शेतकरी मित्रांनो जर शेतीमध्ये काळाच्या ओघात बदल केला तर निश्चितच फायदा मिळवला जाऊ शकतो. कृषी तज्ञांच्या मते शेतकरी बांधवांनी (Farmers) चांगले उत्पन्न प्राप्त करण्यासाठी पीकपद्धतीत बदल करणे महत्त्वाचे आहे.

अलीकडे शेतकरी बांधव पीक पद्धतीत मोठा बदल करत आहेत असे असले तरीदेखील अद्यापही असे अनेक शेतकरी आहेत ज्या पारंपारिक पीक पद्धतीचा अवलंब करीत आहेत.

पारंपरिक पीकपद्धतीत उत्पादन खर्च आणि उत्पन्न त्यामध्ये सांगड बसत नसल्याने शेतकरी बांधवांना मोठ्या प्रमाणात तोटा सहन करावा लागतो. त्यामुळे शेतकरी बांधवांनी पीक पद्धतीत बदल करणे महत्त्वाचे आहे. म्हणूनच आज आपण चंदन लागवडी (Sandalwood Farming) विषयी माहिती जाणून घेणार आहोत.

शेतकरी बांधव चंदन लागवड करून चांगले भरगोस उत्पन्न प्राप्त करू शकता. चला तर मग जाणून घेऊया चंदन शेती विषयी काही महत्वाच्या बाबी. चंदन लागवड करून शेतकरी बांधव करोडोंची कमाई करू शकतात.

चंदन शेती निश्चितच शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरणार आहे कारण की, चंदनाची झाडे संपूर्ण शेतात लावले जाऊ शकतात किंवा हवे असल्यास याची झाडे शेताच्या कडेला लावून शेतात इतर पिके घेतली जाऊ शकतात.

अर्थातच चंदन लागवड करून शेतकरी बांधव दुहेरी फायदा घेऊ शकतील. एका चंदनाच्या झाडापासून शेतकरी 5 ते 6 लाख रुपये कमवू शकतात, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

या गोष्टींची काळजी घ्याचंदनाच्या लागवडीसाठी काही गोष्टींची काळजी घेणे खूप महत्वाचे असते. कृषी तज्ञांच्या मते(Agricultural Scientists), या पिकाला जास्त पाणी लागत नाही, त्यामुळे ते लावताना हे लक्षात ठेवा की ते सखल भागात लावू नये.

चंदनाची वनस्पती ही परोपजीवी वनस्पती आहे, त्यामुळे त्याच्यासोबत यजमान वनस्पती लावणे आवश्यक आहे. कारण की चंदनाचे झाड एकट जगू शकत नाही. चंदनाची रोपे लावल्यानंतर आजूबाजूला स्वच्छतेची विशेष काळजी घ्यावी लागते.

केव्हा लावणार चंदनाचे झाड खरं पाहता, चंदनाचे झाड कधीही लावले जाऊ शकते. पण रोप लावताना काही बाबींची काळजी घेतली पाहिजे जसे की, रोप लागवड करतांना रोप हे दोन ते अडीच वर्षांचे असावे. कारण की, दोन वर्षाचे रोप कोणत्याच परिस्थितीत खराब होतं नाही. चंदन शेतीची सर्वात मोठी विशेषता म्हणजे याची लागवड कोणत्याही ऋतूमध्ये सहज केली जाऊ शकते.

चंदनाचे झाड लावल्यानंतर त्याला पहिली 8 वर्षे कोणत्याही बाह्य संरक्षणाची आवश्यकता नसते कारण तोपर्यंत त्याला सुगंध येत नाही. पण त्याचे झाड परिपक्व झाले की, लगेच त्याला वास येऊ लागतो. यावेळी त्याला संरक्षणाची गरज आहे. त्यासाठी शेताला वेढा घातला पाहिजे यासाठी आपण शेतीला वॉल कंपाऊंड करू शकता.

लागवडीसाठी किती येईल खर्च मित्रांनो आम्ही आपणास सांगू इच्छितो की, जर आपणास चंदनाची लागवड करायची असेल तर याच्या लागवडीसाठी तुम्हाला जास्त गुंतवणूक करण्याची गरज नाही. असं सांगितलं जात की, 100 ते 130 रुपयांना चंदनाचे रोप मिळते याशिवाय त्याला जोडलेल्या होस्ट प्लांटची किंमतही सुमारे 50 ते 60 रुपये आहे.

किती होणार कमाई चंदन शेती निश्चितच फायद्याची ठरणार आहे कारण की, त्याचे लाकूड इतर वनस्पतींच्या तुलनेत सर्वात महागडे लाकूड म्हणुन विकले जाते. या लाकडाचा बाजारभाव 26 हजार ते 30 हजार रुपये प्रति किलो असा नेहमी असतो.

जर एका झाडापासून शेतकऱ्याला 15 ते 20 किलो लाकूड मिळाले. तर मग एका झाडापासून 5 ते 6 लाख रुपये सहज मिळतात. मात्र, सध्या सरकारने चंदनाच्या खरेदी-विक्रीवर बंदी घातली आहे. अशा स्थितीत जर आपण चंदनाची शेती सुरू केली तर आपणास चंदनाचे लाकूड सरकारलाच विक्री करावे लागेल.

 

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe