Farming Business Idea: मसूरची शास्त्रीय पद्धतीने शेती शेतकऱ्याचे उत्पन्न करणार दुप्पट, मिळणार लाखोंचा नफा, जाणुन घ्या मसुरच्या शेतीविषयी

Ahmednagarlive24 office
Published:

Krushi News Marathi: देशातील बहुतांशी भागात पावसावर आधारित शेती (Farming) केली जाते. यामुळे शेतकरी बांधवानी (Farmer) पाण्याची टंचाई लक्षात घेऊन कडधान्य पिकांकडे अधिक लक्ष देण्याची गरज आहे. यामध्ये मसूरचा देखील समावेश करणे आता आवश्यक आहे.

याचे लागवडीचे प्रमाण आपल्या देशात अधिक आहे. मसूर पिकाला (Lentil Crop) अत्यल्प पाणी लागते आणि या पिकापासून अल्प कालावधीत चांगला बक्कळ पैसा (Farmers Income) कमवता येऊ शकतो. त्यामुळे आज आपण मसूर शेती (Lentil Farming) विषयी काही महत्त्वाच्या बाबी जाणून घेणार आहोत. चला तर मग मित्रांनो वेळ न दवडता जाणुन घेऊया याविषयी.

मसूर शेतीसाठी आवश्यक शेतीजमीन
ज्या जमिनीच्या मातीचा पीएच (PH) 6.5 ते 7.5 दरम्यान असतो ती जमीन मसूर शेतीसाठी चांगली मानली जाते. चिकणमाती असलेली जमीन Farmland For Lentil Crop) या पिकासाठी योग्य मानली जाते. हे पीक (Lentil Crop) पाणी साचण्याच्या बाबतीत अत्यंत संवेदनशील आहे, त्यामुळे पाण्याचा निचरा होण्याचे व्यवस्थापन लक्षात घेऊन जमिनीची निवड करावी.

शेतीची तयारी
खरीप पीक (Kharif Season) काढणीनंतर एकदा जमिनीची उलटी नांगरणी करावी आणि नांगरणीनंतर दोन ते तीन वेळा देशी नांगर किंवा कल्टीव्हेटरने पाटा किंवा फळी मारून घ्यावी. एक गोष्ट लक्षात ठेवा की नांगरणी नेहमी दिवसा मुख्यत: सकाळी करावी जेणेकरून पक्षी जमिनीत आढळणारे कीटक खातील.

मसूर शेतीसाठी आवश्यक हवामान आणि पेरणीची वेळ
प्रतिकूल हवामानाचा परिणाम या पिकावर होतो. जास्त दंव आणि थंडीमुळे त्याच्या उत्पादनावर वाईट परिणाम होतो. बियाणे उगवण्याच्या वेळी तापमान 25-28 अंश असावे. मसूर हे रब्बी हंगामात पेरले जाणारे पीक आहे आणि त्याची पेरणीची वेळ मध्य ऑक्टोबर ते मध्य नोव्हेंबर (कार्तिक) आहे. उशिरा पेरणी केल्यास रोगांची शक्यता वाढते.

बियाणे दर आणि पेरणीची पद्धत
मसूराची पेरणी ओळीत करावी व 2 ओळींमधील अंतर 30 सेमी ठेवावे. रोप ते रोप अंतर 8 ते 10 सें.मी. ओळीत पेरणीचा फायदा असा आहे की पीक ऑपरेशन करणे सोपे असते. वेळेवर पेरणीसाठी मोठ्या धान्याच्या प्रजातींसाठी हेक्टरी 50 ते 60 किलो बियाणे आणि लहान धान्यांच्या प्रजातींसाठी 35 ते 40 किलो प्रति हेक्टर बियाणे पुरेसे आहे. पेरणी उशिरा केल्यास बियाणे दर 5 ते 10 ने जास्त वापरावे आणि ओळी ते ओळीतील अंतर 25 सेमी पर्यंत कमी करावे.

बीजोपचार –
2 ग्रॅम थायरम आणि 1 ग्रॅम कार्बेन्डाझिम 2:1 या प्रमाणात मिसळून प्रति किलो बियाण्यावर प्रक्रिया करून सावलीत वाळवावे. यानंतर 5 ग्रॅम रायझोबियम आणि 5 ग्रॅम पीएसबी आणि 5 ग्रॅम गूळ काही पाण्यात मिसळून बियाण्यावर शिंपडा आणि हलक्या हाताने मिसळून पुन्हा सावलीत वाळवा, म्हणजे त्याचा थर बियांच्या वर लागेल.

खत व्यवस्थापन
हेक्टरी 100 ते 300 क्विंटल कुजलेले शेणखत वापरावे आणि माती परीक्षणानंतर केलेल्या शिफारशीनुसारच खतांचा वापर करावा. बागायती क्षेत्रात 20 ते 25 किलो नत्र आणि 30 ते 40 किलो स्फुरद प्रति हेक्‍टरी वापरावे. ज्या भागात झिंकची कमतरता आहे, त्या भागात 25 किलो झिंक सल्फेट प्रति हेक्टर या प्रमाणात द्यावे.

मसूरासाठी पाणी व्यवस्थापन –
भात काढणीनंतर मसूर पीक घेतल्यास ओलावा करण्याची गरज नाही, परंतु जमिनीत ओलावा नसेल तर ओल करून पेरणी करावी. मसूर हे कमी पाणी पिणाऱ्या पिकांपैकी एक असल्याने यासाठी एक सिंचन पुरेसे आहे. मसूरमध्ये पाणी शॉवर पद्धतीने द्यावे. सर्व कडधान्य पिकांना फुलोरा येण्यापूर्वी पाणी द्यावे, फुलोऱ्याच्या वेळी पाणी दिल्यास सर्व फुले गळून पडतात व झाडांमध्ये दाणे तयार होत नाहीत, त्यामुळे उत्पादनात मोठी घट होते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe