Farming Business Idea : नापीक जमिनीवर वर्टीकल फार्मिंग करून कमवा लाखों; कशी करायची सुरुवात वाचा

Ahmednagarlive24 office
Published:

अहमदनगर Live24 टीम, 11 एप्रिल 2022 Krushi news :- देशात दिवसेंदिवस जनसंख्या वाढत आहे मात्र शेतजमीन दिवसेंदिवस कमी होत आहे. वाढते शहरीकरण लक्षात घेता आगामी काही दिवसात शेतीयोग्य जमिनीचे प्रमाण खूपच कमी होणार आहे.

यामुळे शेतीमध्ये आता आधुनिकतेची जोड द्यायला सुरुवात झाली आहे. आता शेतकरी बांधव (Farmer) मातीविना शेती करू लागले आहेत एवढेच नाही कमी जागेत जास्त उत्पादन घेण्यासाठी देखील नव-नवीन टेक्निक आता शास्त्रज्ञांनी शोधून काढल्या आहेत.

यामुळे निश्चितच शेतकऱ्यांना फायदा होत आहे. इजराइल हा देश शेतीमध्ये नवनवीन टेक्निक्सचा उपयोग करत असतो यामुळे या देशाची अर्थव्यवस्था देखील बळकट होत आहे. याशिवाय शेतकऱ्यांचे दरडोई उत्पन्न देखील सुधारण्यास मदत झाली आहे.

याचं इजराइल देशाने आता व्हर्टिकल फार्मिंग (Vertical Farming) या नवीन टेक्निक चा उपयोग करून शेती करण्यास सुरुवात केली आहे.

इजराइल मध्ये सुरू केली गेलेली ही टेक्निक आता आपल्या भारतात देखील दाखल झाली आहे. भारतातील अनेक शेतकरी बांधव (Indian Farmer) आता व्हर्टिकल फार्मिंग करून लाखो रुपये छापत आहेत.

महाराष्ट्रात ही अशी एक कंपनी आहे जी व्हर्टिकल फार्मिंग करीत आहे. A S Agri & Aqua LLP अशा या कंपनीचे नाव आहे या कंपनीच्या एका प्रोजेक्टमध्ये वर्टीकल फार्मिंगचा उपयोग करून हळदीचे उत्पादन घेतले जात आहे.

असे सांगितले जाते की, व्हर्टिकल फार्मिंग या नवीन तंत्रज्ञानचा उपयोग करून फक्त 1 एकर शेतीमधून 100 एकर शेती एवढे उत्पादन घेणे शक्य होते.

म्हणजेच तुम्ही जर शंभर एकर शेती करून जेवढे उत्पादन घेत असाल तेवढेच उत्पादन फक्त एक एकर व्हर्टिकल फार्मिंग करून मिळू शकते. यामुळे वर्टीकल फार्मिंग चा उपयोग कमी क्षेत्रात अधिक उत्पादन मिळविण्यासाठी केले जात असल्याचे सांगितले जाते.

काय आहे वर्टिकल फार्मिंग व्हर्टिकल फार्मिंगसाठी मोठा संच तयार करावा लागतो. ज्याचे तापमान 12 ते 26 अंश सेल्सिअस दरम्यान ठेवले जाते. मग यामध्ये, पाइपला सुमारे 2-3 फूट लांब आणि रुंद कंटेनरमध्ये उभे केले जाते. यामध्ये वरचा भाग मोकळा ठेवला जातो. ज्यामध्ये हळदीची लागवड केली जाते.

मित्रांनो आम्ही आपणांस सांगू इच्छितो की, बहुतेक लोक हायड्रोपोनिक किंवा एक्वापोनिक पद्धतीने वर्टिकल फार्मिंग करतात, ज्यात माती वापरली जात नाही, परंतु या प्रोजेक्ट मध्ये माती वापरली जाते. तापमान नियंत्रित करण्यासाठी फॉगर्स स्थापित केले जातात याद्वारे तापमान वाढल्यानंतर पाण्याचा फवारा मारला जातो आणि तापमान सामान्य होतं असते. एकदा पाईप बसवल्यानंतर जास्त काळ पाईप बदलण्याची गरज नाही.

कशी केली जाते वर्टिकल फार्मिंग मीडिया रिपोर्ट्सनुसार, जर वर्टिकल फार्मिंग मध्ये हळद लागवड करायची असेल, तर हळदीच्या बिया 10-10 सेमी अंतरावर झिग-झॅग पद्धतीने पेरल्या जातात. जसजशी हळद वाढते तसतसे तिची पाने काठाच्या जागेतून बाहेर पडतात.

हळदीला जास्त सूर्यप्रकाश लागत नाही आणि याचे सावलीतही चांगले उत्पादन घेतले जाते यामुळे वर्टिकल फार्मिंग तंत्राने हळदीचे खूप चांगले उत्पादन घेता येते.

हळदीचे पीक 9 महिन्यांत तयार होते. या तंत्रज्ञानाचा वापर करून हळद काढणीनंतर लगेच पुन्हा लावता येते. म्हणजेच 3 वर्षांत 4 वेळा हळद लागवड याद्वारे शक्य होते. मित्रांनो सामान्य शेतीत हळदीचे पीक वर्षातून एकदाच घेता येते तसेच यामध्ये हवामानाची काळजी घ्यावी लागते.

वर्टिकल फार्मिंगचे फायदे पण जाणुन घ्या वर्टिकल शेतीसाठी हवामानावर अवलंबून राहण्याची गरज नाही, म्हणजेच या तंत्राचा वापर करून हवी तेव्हा शेती करता येते. ही लागवड पूर्णपणे बंद जागेत होते, त्यामुळे कीटकांमुळे किंवा पाऊस किंवा वादळामुळे नुकसान होण्याची शक्यता यामध्ये नसते. फक्त यामध्ये शेडचे कोणतेही नुकसान व्हायला नको. या प्रकारच्या शेतीमुळे पाण्याच्या वापरातही मोठ्या प्रमाणात बचत होते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe