ताज्या बातम्या

Farming Buisness Idea : हा शेतकरी करतोय भाडेतत्वावर शेती आणि कमवतोय लाखो रुपये !

Farming Buisness Idea : शेती करण्याचे अनेक पर्याय उपलब्ध झाले आहेत. जसजसा काळ बदलत आहे तसतशी शेती (Farming) करण्याची पद्धत देखील बदलत आहे. शेतकरी (Farmers) आता आधुनिक पदतीने शेती करू लागल्याने अधिकाधिक नफा मिळू लागला आहे.

अली अहमद (Ali Ahmed) हा उत्तर प्रदेशातील एका वस्तीवर राहणारा प्रगतीशील शेतकरी आहे. मात्र, त्यांच्याकडे स्वत:ची फारशी जमीन नसून, ती जमीन भाडेतत्त्वावर (Farming on lease basis) घेऊन तो शेती करत आहे.

या जमिनीवर त्यांनी शेतीचे असे मॉडेल बनवले आहे की, त्याबद्दल ऐकून लोक आश्चर्यचकित होतात. भाडेतत्त्वावर घेतलेल्या जमिनीवर दरवर्षी १० लाख रुपये कमावता येतात यावर कोणाचाही विश्वास बसत नाही.

फळे आणि भाज्यांसह मधमाशी पालन

अली अहमद हे ५ हेक्टर जमिनीवर केळी, टोमॅटो व इतर भाजीपाला लागवडीसोबतच मधमाशी पालन करतात. तो स्वतः मध तयार करतो. ते सांगतात की, परिसरातील लोक त्यांच्या शेतातून तीन क्विंटल मध तीनशे रुपये किलो दराने विकत घेतात. केळी आणि भाजीपाला अली अहमद बाजारातून चांगला दर मिळेल तिथे विकतो.

खर्च कमी झाला तर उत्पन्न वाढले

आपले उत्पन्न वाढवण्यासाठी अलीने आपल्या शेतीचा खर्च कमी करण्यावर लक्ष केंद्रित केले. अली अहमद सौर पॅनेलद्वारे चालणाऱ्या मोटारीने शेतात सिंचनाचे काम करतात. अली अहमद सांगतात की शेजारच्या शेतात सिंचन केल्याने त्यांच्या सोलर प्लांटचा खर्चही निघून गेला आहे.

शेतात काम करण्यासाठी त्याच्याकडे हाताने चालणारा पॉवर ट्रॅक्टर आहे आणि त्याने मध काढण्यासाठी स्वतःचा प्लांट लावला आहे. शेतीसाठी त्यांना जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार आणि सन्मान मिळाले आहेत.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts