FD Rate: जर तुम्ही येणाऱ्या काळात गुंतणूक करणार असाल किंवा त्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक सुवर्णसंधी प्राप्त झाली आहे. तुम्ही या संधीचा फायदा घेत भविष्यासाठी मोठी गुंतवणूक करू शकतात. आम्ही तुम्हाला सांगतो खाजगी बँक अॅक्सिस बँकेने आपल्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी एफडीच्या व्याजदरात वाढ केली आहे. यामुळे आता ग्राहकांना जास्त नफा मिळणार आहे.
दर वाढल्यानंतर सात दिवसांपासून ते 10 वर्षांपर्यंतच्या एफडीवर 4.80 टक्के ते 7.25 टक्के व्याजदर दिला जात आहे. विशेष म्हणजे गेल्या वर्षी डिसेंबरमध्येही बँकेने व्याजदरात वाढ केली होती. त्यावेळी 7 दिवसांपासून ते 10 वर्षांपर्यंतच्या एफडीवर दोन कोटींपेक्षा कमी रकमेच्या एफडीवर 7.00 टक्के व्याज दिले जात होते, तर ज्येष्ठ नागरिकांना एफडीवर जास्तीत जास्त 7.75 टक्के व्याज मिळत होते.
अॅक्सिस बँकेचे नवीन व्याजदर
7 दिवसांपासून 45 दिवसांच्या एफडीवर 4.80 टक्के व्याजदर
46 दिवसांपासून ते 60 दिवसांपर्यंतच्या एफडीवर 6.25 टक्के व्याजदर
60 दिवसांपासून ते 6 महिन्यांपर्यंतच्या FD वर 6.35 टक्के व्याजदर
6 महिने ते 9 महिन्यांच्या FD वर 6.50 टक्के व्याजदर
9 महिने ते एक वर्षाच्या FD वर 6.65 टक्के व्याजदर
एक वर्षापेक्षा जास्त आणि दोन वर्षांपर्यंतच्या FD वर 7.25 टक्के व्याजदर
दोन वर्षे आणि 10 वर्षांपेक्षा जास्त कालावधीच्या FD वर 7.00 टक्के व्याज
ज्येष्ठ नागरिकांसाठी नवीन FD व्याजदर
7 दिवसांपासून 45 दिवसांच्या एफडीवर 4.80 टक्के व्याजदर
46 दिवसांपासून ते 60 दिवसांपर्यंतच्या एफडीवर 6.25 टक्के व्याजदर
60 दिवसांपासून ते 6 महिन्यांपर्यंतच्या FD वर 6.35 टक्के व्याजदर
6 महिने ते 9 महिन्यांच्या FD वर 6.75 टक्के व्याजदर
9 महिने ते एक वर्षाच्या FD वर 6.90 टक्के व्याजदर
एक वर्षापेक्षा जास्त आणि दोन वर्षांपर्यंतच्या FD वर 8.00 टक्के व्याजदर
दोन वर्षे आणि 10 वर्षांपेक्षा जास्त कालावधीच्या एफडीवर 7.75 टक्के व्याजदर
हे पण वाचा :- Post Office Schemes: होणार ग्राहकांची मजा ! ‘या’ योजनेत मिळत आहे बंपर पैसा ; जाणून घ्या सर्वकाही