FD Rate Hike: मागच्या महिन्यात आरबीआयने रेपो रेटमध्ये वाढ केल्यानंतर अनेक बँकांनी आतापर्यंत मुदत ठेवींच्या व्याजदरात वाढ करत ग्राहकांना या महागाईच्या काळात दिलासा दिला आहे, तर आता पुन्हा एकदा तीन बँकांनी मुदत ठेवींच्या व्याजदरात मोठी वाढ केली आहे.
कोटक महिंद्रा आणि HDFC बँकेने ठराविक मुदतीच्या मुदत ठेवींवरील व्याजदरात वाढ केली आहे . याशिवाय इंडियन ओव्हरसीज बँकेने मुदत ठेवींवरील व्याजदरात 60 बेस पॉईंट्सपर्यंत वाढ केली आहे. बँकेने घेतल्या या निर्णयामुळे हजारो ग्राहकांचा फायदा होणार आहे.
एचडीएफसी बँकेचे नवे व्याजदर 8 नोव्हेंबरपासून लागू झाले आहेत, तर कोटक महिंद्रा बँकेचे दर आजपासून लागू झाले आहेत. HDFC बँकेने 2 कोटी रुपयांपेक्षा कमी आणि 15 महिने ते 10 वर्षात परिपक्व होणाऱ्या मुदत ठेवींसाठी व्याजदरात 35 बेस पॉइंट्सची वाढ केली आहे. कोटक महिंद्रा बँकेने 2 कोटी रुपयांपेक्षा कमी मुदत ठेवींवरील व्याजदरातही वाढ केली आहे. नोव्हेंबरमध्ये बँकेने दुसऱ्यांदा व्याजदर वाढवले. कोटक महिंद्रा बँकेनेही 1 नोव्हेंबर रोजी एफडी व्याजदरात वाढ केली.
HDFC बँक नवीन FD व्याजदर
आता, एचडीएफसी बँक सामान्य ग्राहकांसाठी 3% ते 6.25% पर्यंत आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी 3.50% ते 7.00% पर्यंत 7 दिवस ते 10 वर्षांमध्ये परिपक्व होणाऱ्या FD वर व्याज देईल. बँकेने आता 15 महिने 1 दिवसापासून 18 महिन्यांपर्यंत परिपक्व होणाऱ्या एफडीवरील व्याज 6.15% वरून 6.40% पर्यंत 25 आधार अंकांनी वाढवले आहे. 18 महिने ते 2 वर्षांच्या मुदतीच्या ठेवींवरील व्याजदर देखील 35 आधार अंकांनी वाढवून 6.50 टक्के प्रतिवर्ष केला आहे.
HDFC बँकेने 2 वर्ष 1 दिवस ते 5 वर्षांपर्यंत मुदत ठेवींवरील व्याजदर 6.25% वरून 6.50% पर्यंत वाढवला आहे. 5 वर्ष 1 दिवस ते 10 वर्षात मॅच्युअर झाल्यावर आता ग्राहकांना 6.20 टक्क्यांऐवजी 6.25 टक्के व्याज मिळेल.
IOB ने दर 0.60 टक्क्यांपर्यंत वाढवले आहेत
इंडियन ओव्हरसीज बँकेने मुदत ठेवींवरील व्याजदरात 60 बेस पॉईंट्सपर्यंत वाढ केली आहे. म्हणजेच आता बँक ग्राहकाला जास्त व्याज मिळणार आहे. बँकेने एका निवेदनात म्हटले आहे की 270 दिवस ते एक वर्ष आणि एक वर्ष ते तीन वर्षांच्या मुदत ठेवींवरील व्याजदर 60 आधार अंकांनी वाढवले आहेत. IOB 7 दिवसांपासून ते 10 वर्षांपर्यंतच्या मुदत ठेवींवर 3.60% ते 5.85% पर्यंत व्याजदर देत आहे. त्याच वेळी, 1000 दिवसांच्या मुदत ठेवींवर सर्वाधिक 6.00% व्याजदर दिला जात आहे. सुपर ज्येष्ठ नागरिकांना (80 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाचे) 0.75% अतिरिक्त दर मिळेल, तर ज्येष्ठ नागरिकांना इंडियन ओव्हरसीज बँकेत (IOB) 0.50% अतिरिक्त दर मिळेल.
आता कोटक महिंद्रा बँक जास्त व्याज देणार
365 दिवस ते 389 दिवसांच्या कालावधीत मॅच्युअर होणाऱ्या एफडीवर आता सर्वसामान्य ग्राहकांना 6.10 टक्क्यांऐवजी 6.25 टक्के आणि ज्येष्ठ नागरिकांना 6.40 टक्के व्याज मिळेल. ज्येष्ठ नागरिकांना सर्व कालावधीच्या FD मध्ये 0.50 bps अधिक व्याज मिळेल. 3 वर्षे आणि त्याहून अधिक मुदतीच्या ठेवींवर 4 वर्षांपेक्षा कमी मुदतीच्या ठेवींवर आता 6.25 ऐवजी 6.30 टक्के व्याज मिळेल.
हे पण वाचा :- Realme चा मार्केटमध्ये धमाका ! लॉन्च केला ‘हा’ दमदार फोन ; फीचर्स पाहून व्हाल तुम्ही थक्क