FD Rates : देशात अनेक बँका आहेत. यातील काही बँका सरकारी आहेत तर काही बँका खाजगी आहेत. प्रत्येक बँकेचे काही नियम असतात. त्यांचे वेगवेगळे व्याजदर असते. अनेक ग्राहक जास्त व्याजदर देणाऱ्या बँकेत खाते चालू करतात.
त्यापैकी अनेक ग्राहक FD मध्ये गुंतवणूक करतात. कारण सर्वसामान्य खात्यापेक्षा या FD मध्ये जास्त परतावा दिला जातो. त्यामुळे ग्राहक FD मध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करतात. सध्या अशी एक बँक आहे जी आपल्या ग्राहकांना सर्वात जास्त व्याज देत आहे.
बँक ऑफ इंडियाचा नवीन FD दर
बँक ऑफ इंडियाद्वारे FD व्याजदरांवरील ताज्या सुधारणांनंतर, ही बँक 7 ते 45 दिवसांच्या मुदतीच्या FD साठी आपल्या सामान्य ग्राहकांसाठी 3 टक्के व्याज दर देत आहे. तसेच 46 ते 179 दिवसांच्या मुदतीच्या FD योजनांवर 4.50 टक्के दराने व्याज देण्यात येत आहे.
त्यानंतर, बँक आपल्या ग्राहकांसाठी 180 दिवस ते 269 दिवसांच्या मुदतीच्या FD योजनांवर 5.50 टक्के दराने व्याज देत आहे. ही बँक 270 दिवस ते 1 वर्षात परिपक्व होत असणाऱ्या FD योजनांवर 5.75 टक्के व्याज दर देत आहे.
इतकेच नाही तर बँक 1 वर्ष ते 399 दिवसांसाठी FD स्कीमवर 6.50 टक्के दराने व्याज देत आहे. या बँकेकडून 400 दिवसांच्या मुदतीच्या FD योजनेवर 7.25 टक्के दराने व्याज देण्यात येत आहे. 1 वर्ष ते 2 वर्षांच्या FD वर 6.50 टक्के दराने व्याज मिळेल.
ही बँक 2 वर्षांच्या कालावधीसह FD वर 6.80 टक्के दराने व्याज देत असून हे 2 वर्ष ते 3 वर्षांपेक्षा कमी कालावधीत मॅच्युअर होत असणाऱ्या FD वर 6.75 टक्के दर देत आहे. हे लक्षात घ्या की बँक 2 ते 3 वर्षांच्या कालावधीसाठी 6.75 टक्के दराने व्याज देण्यात येत असून बँक 3 वर्षे ते 5 वर्षे FD वर 6.50 टक्के दराने व्याज देत आहे.
बँक ऑफ इंडियाचा वृद्धांसाठी व्याजदर
बँक ऑफ इंडिया म्हणजेच BOI आपल्या वृद्ध नागरिकांसाठी 7 दिवस ते 10 वर्षांच्या कालावधीतील FD योजनांवर 3 टक्के ते 7.75 टक्के व्याज देत आहे.