ताज्या बातम्या

FD Rates: होणार बंपर कमाई ! ‘या’ बँकेने पुन्हा वाढवले एफडीवरील व्याजदर ; जाणून घ्या नवीन दर

FD Rates: तुम्ही देखील गुतंवणूकीसाठी बँकेमध्ये एफडी करण्याचा विचार करत असाल तर आम्ही तुम्हाला सांगतो कोटक महिंद्रा बँकेने सात दिवसांत तिसऱ्यांदा एफडीवरील व्याजदरात वाढ केली आहे.यामुळे आता ग्राहकांना एफडीवर मोठ्या प्रमाणात परतावा मिळणार आहे.

आम्ही तुम्हाला सांगतो बँकेने आज  काही FD योजनांवरील व्याजात 0.25 टक्क्यांनी वाढ केली आहे. बँक सध्या FD वर जास्तीत जास्त 7.50 टक्के व्याज देत आहे. तुमच्या माहितीसाठी आम्ही तुम्हाला सांगतो  बँकेने 9 डिसेंबरपासून एफडीचे दर तीनदा वाढवले आहेत.

7 डिसेंबर रोजी झालेल्या पतधोरण बैठकीत रिझर्व्ह बँकेने रेपो दर 35 बेस पॉईंट्सने वाढवून 6.25 टक्के केला होता. रिझर्व्ह बँकेने रेपो दरात वाढ केल्यानंतर जवळपास सर्वच बँकांनी एफडीवरील व्याजदरात वाढ केली आहे.  अधिकाधिक ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी बँका दर वाढवत आहेत. बहुतांश बँका कर्ज आणि एफडीवर व्याज वाढवत आहेत.

कोटक महिंद्रा बँकेचे नवीन एफडी दर

बँक आता 7 ते 14 दिवसांच्या एफडीवर सर्वसामान्यांना 2.75 टक्के आणि ज्येष्ठ नागरिकांना 3.25 टक्के व्याज देत आहे. त्याचबरोबर 15-30 दिवसांसाठी सर्वसामान्यांना 3 टक्के आणि ज्येष्ठ नागरिकांना 3.50 टक्के दराने व्याज दिले जात आहे.

त्याचप्रमाणे, 390 दिवसांच्या (12 महिने 25 दिवस) FD वर सर्वसामान्यांसाठी 7 टक्के आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी 7.50 टक्के व्याज देत आहे. 5 वर्षे ते 10 वर्षांपर्यंतच्या FD वर बँक सर्वसामान्यांना 6.20 टक्के आणि ज्येष्ठ नागरिकांना 6.70 टक्के व्याज देत आहे. तुम्ही बँकेच्या वेबसाइटवर सर्व FD योजनांसाठी नवीनतम FD दर तपासू शकता.

 सात दिवसांत तीनदा एफडीचे दर वाढवले

कोटक महिंद्रा बँकेने गेल्या सात दिवसांत तीन वेळा एफडीचे दर वाढवले आहेत. 15 डिसेंबर रोजी एफडी दर 0.25 टक्क्यांनी वाढवण्यापूर्वी, बँकेने 10 डिसेंबर आणि 14 डिसेंबरलाही एफडी दर वाढवले होते. बँकेचे नवीन दर 2 कोटी रुपयांपेक्षा कमी रकमेच्या एफडीवर लागू होतील. बँक आता 390 दिवसांच्या एफडीवर 7% दराने व्याज देत आहे. कोटक बँकेचे हे नवीन एफडी दर 15 डिसेंबरपासून लागू होणार आहेत.

हे पण वाचा :-   PM Awas Yojana: गरिबांचे स्वप्न होणार पूर्ण !’या’ योजनेत मिळणार 2 लाख पक्की घरे ; असा करा अर्ज

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts