FD Scheme : देशातील जवळपास सर्वच मोठ्या बँकांनी आपल्या ग्राहकांसाठी अनेक अल्प मुदतीच्या मुदत ठेव योजना सुरू केल्या आहेत, ज्या नियमित मुदत ठेवींच्या तुलनेत कमी वेळेत सर्वात जास्त व्याज देतात. जर तुम्हालाही कोणत्याही बँकेच्या योजनांमध्ये गुंतवणूक करण्याचा रस असेल तर तुमच्याकडे गुंतवणुकीसाठी आता एक उत्तम चांगली संधी आहे.
मागील वर्षभरात भारतीय रिझर्व्ह बँकेने रेपो दरात लक्षणीय वाढ केल्याने मुदत ठेवीचे व्याज दर शिखरावर पोहोचले आहेत. अशातच आता जर तुम्ही खासगी क्षेत्रातील बँक कोटक महिंद्रा बँकेचे ग्राहक असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण बँकेने एफडीच्या व्याजदरात खूप मोठा बदल केला आहे.
कोटक महिंद्रा बँकेने त्याच्या 2 कोटी रुपयांच्या एफडीच्या व्याजदरात सुधारणा केली आहे. बँकेने हे नवीन दर लागू केले आहेत. ज्यामुळे बँकेच्या ग्राहकांच्या कमाईत वाढ होईल. परंतु जर तुम्ही मुदत ठेवींमध्ये गुंतवणूक करत असाल तर तुम्हाला काही गोष्टी लक्षात ठेवाव्या लागणार आहेत. नाहीतर तुम्हाला आर्थिक फटका बसेल. जाणून घेऊयात सविस्तर माहिती.
अलीकडे, बँक आपल्या 7 ते 10 वर्षांच्या एफडीवर सर्वसामान्य गुंतवणूकदारांना 2.75 टक्के ते 7.25 टक्के इतके व्याज देत आहे. तसेच ज्येष्ठ नागरिकांना या FD योजनेवर 7.75% दराने परतावा देण्यात येत आहे. म्हणजे सर्वात जास्त परतावा बँकेच्या देण्यात येत आहे.
इतके दिवस FD वर सर्वाधिक व्याज मिळत आहे
तर त्याच वेळी, बँक 23 महिन्यांची सर्वाधिक व्याजाची एफडी देत असून ज्यात सर्वसामान्य गुंतवणूकदारांसाठी 7.25 टक्के इतके व्याजदर मिळत आहे. तर ज्येष्ठ नागरिकांसाठी हे दर 7.75 टक्के इतके आहेत. 23 महिन्यांच्या एफडीवर 7.20 टक्के, 1 दिवस ते 2 वर्षांपेक्षा कमी कालावधीच्या एफडीवर 7 टक्के, 2 वर्ष ते 3 वर्षांच्या एफडीवर 7 टक्के आणि 3 वर्षे ते 4 वर्षांच्या एफडीवर 6.50 टक्के दराने व्याज देण्यात येत आहे. यानंतर 4 ते 5 वर्षांच्या एफडीवर 6.25 टक्के दराने व्याज देण्यात येत आहे. तर 5 ते 10 वर्षांच्या FD वर 6.20 टक्के दराने व्याज देण्यात येत आहे.