Gotabaya Rajapaksa : श्रीलंकेचे राष्ट्रपती गोटबाया राजपक्षे यांनी जवळपास दोन आठवड्यानंतर देशातील आणीबाणी हटवण्याची घोषणा केली. शुक्रवारी मध्यरात्रीपासून देशातील आणीबाणी हटवण्याची घोषणा केली आहे.
मात्र जनता सरकारविरोधात अजूनही संतप्त असून आर्थिक परिस्थिती दिवसेंदिवस चिंताजनक होत आहे. या निर्णयावरून भारतातीही टीका आणि चर्चा सुरू होती.सरकारच्या विरोधात जनतेने हिंसक आंदोलन सुरु केल्यानंतर राष्ट्रपती गोटबाया यांनी ६ मे च्या रात्रीपासून देशात आणीबाणी लागू करण्याची घोषणा केली होती.
श्रीलंकेत महागाईचा दर ४० टक्के पर्यंत पोहोचला आहे. भोजन, इंधन आणि औषधांच्या कमतरतेशिवाय विजेच्या संकटामुळे जनता संतप्त होऊन रस्त्यावर उतरली. देशातील कायदा व सुव्यवस्थेची स्थिती सुधारण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. आणीबीणीच्या काळात पोलीस व सुरक्षा दलांकडे कोणालाही अटक करण्याचा अधिकार होता.