ताज्या बातम्या

Old Pension : अखेर सरकारने उचलले कर्मचाऱ्यांच्या हितासाठी महत्त्वाचे पाऊल, जाणून घ्या संपूर्ण माहिती

Old Pension : गेल्या काही दिवसांपासून तुम्ही जुनी पेन्शन योजना हा शब्द अनेकदा ऐकत असाल किंवा वाचत असाल. कारण सर्वत्र जुन्या पेन्शनचा मुद्दा चांगलाच गाजला आहे. ठिकठिकाणी तर जुन्या पेन्शन योजना लागू करण्यासाठी आंदोलने करण्यात आली आहेत.

काही राज्यांनी तर आपल्या कर्मचाऱ्यांच्या हितासाठी पुन्हा एकदा जुनी पेन्शन योजना लागू केली आहे. अशातच आता महाराष्ट्रातही जुनी पेन्शन लागू करावी अशी मागणी जोर धरू लागली आहे. त्यामुळे सर्व कर्मचाऱ्यांचे लक्ष सरकारच्या भूमिकेकडे लागले आहे.

लवकरच कर्नाटक सरकारची समिती राजस्थानला भेट देणार

जुन्या पेन्शनबाबत सरकारी कर्मचाऱ्यांची मागणी लक्षात घेता सरकारकडून जुनी पेन्शन परत आणण्याच्या मागणीसाठी समिती स्थापन करण्यात आली आहे. तसेच या समितीच्या अहवालाच्या आधारे जुनी पेन्शन पूर्ववत करण्याबाबत बोलायचे झाले तर कर्नाटक सरकार जुन्या पेन्शन योजनेच्या अंमलबजावणीबाबत माहिती गोळा करण्यासाठी लवकरच तीन सदस्यीय समितीसह राजस्थानला भेट देणार आहे. जुनी पेन्शन कशी लागू करायची याचा अहवाल देण्यासाठी या समितीचे गठन केले आहे.

ओपीएस लागू करण्यात येणार

25 मार्चला ही समिती राजस्थानला जाऊ शकते. जर कर्नाटकमध्ये जुनी पेन्शन लागू झाली तर, ते भाजपशासित पहिले राज्य असणार आहे, ज्याने OPS लागू करणे अपेक्षित आहे. याबाबत सूत्रांनी असे सांगितले की, कर्मचाऱ्यांच्या मागणीनंतर कर्नाटक सरकारकडून 2006 नंतर नोकरीवर रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना ओपीएस पुन्हा लागू करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.

मुख्य सचिवांच्या नेतृत्वाखाली समितीची स्थापना करण्यात आली

यासाठी अतिरिक्त मुख्य सचिवांच्या नेतृत्वाखाली समिती स्थापन केली आहे. ही समिती लवकरच राजस्थानसह पाच राज्यांना भेट देणार आहे, जिथे ओपीएस लागू केला आहे. ही समिती प्रथम राजस्थानला भेट देणार असल्याचा दावाही सूत्रांकडून केला जात आहे. मुख्य सचिव उषा शर्मा, वित्त सचिव अखिल अरोरा आणि मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव कुलदीप रांका यांची येथे बैठक पार पडणार आहे.

राजस्थान सरकारने एप्रिल 2022 मध्ये OPS पुनर्संचयित केले असून 1 जानेवारी 2004 ते 31 मार्च 2022 या कालावधीत सेवानिवृत्त झालेल्या लोकांनी काढलेले पैसे जमा करण्याची व्यवस्थाही राज्य सरकारकडून केली जात आहे.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office
Tags: Old Pension

Recent Posts