ताज्या बातम्या

किरीट सोमय्यांच्या घरी आर्थिक गुन्हे शाखेची टीम घरी दाखल, सोमय्यांना मोठा झटका बसण्याची शक्यता

मुंबई : भाजप (BJP नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे, कारण आर्थिक गुन्हे शाखेची टीम (Financial Crimes Branch team) सोमय्यांना मोठा झटका देण्याच्या तयारीत आहे.

सोमय्या यांच्या घरी ही टीम दाखल झाली असून राजकीय वर्तुळात चर्चा रंगू लागल्या आहेत. पण अधिकारी जेव्हा त्यांच्या घरी गेले तेव्हा सोमय्यांचं घर बंद होतं. तिथे किरीट सोमय्या नव्हते. त्यामुळे अधिकाऱ्यांनी त्यांच्या घराच्या दरवाज्यावर नोटीस लावली आहे.

मुंबई सत्र न्यायालयाने (Mumbai Sessions Court) आयएनएस विक्रांत (INS Vikrant) प्रकरणी किरीट सोमय्या यांचा जामीन फेटाळला आहे. त्यानंतर सोमय्या यांच्यासोबत अनपेक्षित आणि अडचणीत आणणाऱ्या घटनाच घडताना दिसत आहेत.

विशेष म्हणजे कोर्टाने जामीन फेटाळल्यानंतर सोमय्या हे नॉट रिचेबल होते. पण त्यांनी ट्विटरच्या (Tweet) माध्यमातून व्हिडीओ शेअर करत आपल्यावरील सर्व आरोपांचं खंडन केलं होतं.

मात्र, ते अद्यापही प्रसारमाध्यमांसमोर आलेले नाहीत. या सगळ्या घडामोडी एकीकडे घडत असताना आर्थिक गुन्हे शाखेचे अधिकारी आज दुपारी किरीट सोमय्या यांच्या घरी गेले. पण सोमय्या यांच्या घराला कुलूप होतं. सोमय्या घरात नव्हते.

त्यामुळे सोमय्या नेमके गेले कुठे? असा प्रश्न उपस्थित केला जातोय. पोलिसांनी याआधी INS विक्रांत घोटाळा प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर किरीट सोमय्या आणि त्यांचे पुत्र नील सोमय्या यांना चौकशीसाठी हजर राहण्याचे समन्स बजावले होते. पण सोमय्या पिता-पुत्र चौकशीसाठी हजर राहिले नव्हते.

सोमय्या यांनी याप्रकरणी अटकपूर्व जामीनासाठी कोर्टात धाव घेतली होती. पण कोर्टाने सोमय्या पिता-पुत्रांचा अटकपूर्व जामीन स्वीकारला नाही. त्यामुळे सोमय्या यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. या सर्व घडामोडींनंतर EOWचे अधिकारी आज सोमय्या यांच्या कार्यालयावर दाखल झाले.

Renuka Pawar

Recent Posts