ताज्या बातम्या

Fish Farming: मत्स्यपालन करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी महत्वाची माहिती; यावेळी तयार करा मत्स्यपालनासाठी तलाव

Fish Farming:काळाच्या ओघात शेतीमध्ये मोठे बदल पाहायला मिळत आहेत. अलीकडे देशातील शेतकरी बांधव उत्पन्नवाढीच्या अनुषंगाने पशुपालन (Animal Husbandry) मोठ्या प्रमाणात करत आहेत.

खरं पाहता पशुपालन व्यवसाय शेतकऱ्यांसाठी मोठा फायदेशीर ठरत आहे, कारण की या व्यवसायातून उत्पादन खर्च वगळून चांगला नफा मिळत आहे. पशुपालनातील मत्स्यपालन व्यवसाय (Fisheries business) हा पशुपालन करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी आजच्या काळात उदयोन्मुख व्यवसाय म्हणून उदयास येत आहे.

आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की, आपल्या भारतात सुमारे 60% भारतीय आहेत, जे त्यांच्या आहारात माशांच्या समावेश करत असतात. त्यामुळे भारतात मोठ्या प्रमाणात मत्स्यपालन (Fisheries) होत असते.

याशिवाय भारतातील तलाव, आणि नद्यांमधील पाण्याची पातळी खूप चांगली आहे, त्यामुळे माशांचे उत्पादन (Fish production) करणे देखील खूप सोपे आहे. देशाबरोबरच परदेशातही मासळीची मागणी वाढत असून,

त्यामुळे मत्स्यपालन व्यवसाय मोठ्या प्रमाणात केला जात आहे. मत्स्य पालन करणाऱ्या पशुपालक शेतकऱ्यांच्या (Farmer) चांगल्या नफ्यासाठी आज आम्ही आपणांस एक महत्त्वाची माहिती सांगणार आहोत.

खरं पाहता, मत्स्यपालनामध्ये प्रत्येक महिना महत्त्वाचा असला तरी एप्रिल हा महिना असा आहे ज्यामध्ये मत्स्यपालनासाठी नवीन तलाव आणि जुने तलाव स्वच्छ करण्याची योग्य वेळ मानली जाते,

त्यामुळे मत्स्यपालनांसाठी एप्रिल हा महत्त्वाचा महिना मानला जातो. असे असले तरी, या काळात काही नुकसान होण्याचीही शक्यता असते. अशा परिस्थितीत नुकसान टाळण्यासाठी काही महत्त्वाच्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे असा सल्ला जाणकार लोक देत असतात.

या गोष्टींची काळजी घ्या
»नवीन तलाव बांधण्यासाठी एप्रिल महिना योग्य मानला जातो, त्यामुळे तुम्ही तलावाच्या बांधकामासाठी या महिन्यात जागा निवडू शकता.
»मत्स्यपालक शेतकऱ्यांनी या महिन्यात जुन्या तलावांची नीट दुरुस्ती करावी असा सल्ला दिला जातो.
»मत्स्यबीज उत्पादक एप्रिल महिन्यात ग्रास कार्पची हॅचरी प्रजनन सुरू करू शकतात.
»तलावातील जलीय किडे, तण, लहान मासे यांची स्वच्छता लवकर लवकर करावी, जेणेकरून पाणी स्वच्छ राहते असा देखील सल्ला जाणकार लोक देत असतात.
»एप्रिल महिन्यात कॉमन कार्प मत्स्यबीज तलावात साठवावे असे सांगितले जाते.
»याच एप्रिल महिन्यात पाण्यात ऑक्सिजनची कमतरता असते, त्यामुळे तलावातील माशांची संख्या वाढवू नये असा सल्ला दिला जातो.
»या महिन्यात तलावाच्या पाण्यात ऑक्सिजन वाढवणारे औषध टाकत राहावे जेणेकरून पशुधनाचे नुकसान होणार नाही.
»हा महिना माशांच्या प्रजननासाठी देखील उत्तम असतो, त्यामुळे माशांना पौष्टिक आहार द्यावा.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts