Fixed Deposit : तुम्हीही ‘या’ एफडीमध्ये करत असाल गुंतवणूक तर दरमहा होईल सर्वाधिक फायदा, जाणून घ्या अधिक

Fixed Deposit : अनेकजण गुंतवणुकीवरील कर बचत करण्यासाठी कर बचतीची मुदत ठेव करतात, ज्यामुळे त्यांचा कर कापला जाणार नाही. अलीकडच्या काळात सर्व गुंतवणूकदारांसाठी बँक एफडी एक सर्वोत्तम गुंतवणूक पर्याय उपलब्ध आहे.

सुरक्षित गुंतवणुकीच्या पर्यायाबद्दल बोलायचे झाले तर सर्वात अगोदर बँक एफडीचे नाव आपल्या समोर येते. जर तुम्हीही तुमची FD करत असाल तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी आहे. तुम्हाला जास्त फायदा होऊ शकतो. जाणून घ्या सविस्तर माहिती.

सर्वात महत्त्वाचे म्हणजे मुदत ठेवी दोन प्रकारच्या असतात. पहिली म्हणजे संचयी एफडी आणि दुसरी नॉन-क्युम्युलेटिव्ह एफडी ज्यात गुंतवणूकदार गुंतवणूक करू शकतात. हे लक्षात घ्या की Cumulative FD मध्ये, मुद्दल आणि व्याजाची रक्कम जोडून मॅच्युरिटी रक्कम मिळवण्यात येते. नॉन-क्युम्युलेटिव्ह एफडीत तुमची व्याजाची रक्कम मासिक, त्रैमासिक किंवा अर्धवार्षिक प्राप्त होणार आहे, हे तुम्ही ठरवू शकता.

जाणून घ्या फायदे

हे लक्षात घ्या की स्टेट बँक ऑफ इंडिया आणि ICICI बँक यासारख्या अनेक बँका या प्रकारच्या नॉन-क्युम्युलेटिव्ह एफडी योजना ऑफर करत असतात. या प्रकारच्या FD मध्ये Cumulative च्या तुलनेत व्याज कमी असून यात चक्रवाढ व्याजाचा कोणताही फायदा नसतो. यात एकच फायदा आहे की तुम्हाला वेळोवेळी लिक्विड कॅश मिळत राहील. यावर कर्जाची सुविधा उपलब्ध असून यात गुंतवणुकीची कोणतीही मर्यादा नसते. त्यात तुम्हाला हवे तितके पैसे गुंतवू शकता.

मासिक उत्पन्न

ज्या लोकांकडे उत्पन्नाचा दुसरा स्रोत नाही त्यांच्यासाठी नॉन-क्युम्युलेटिव्ह एफडी योजना सर्वात उत्तम आहे. तुम्हाला Cumulative मध्ये नियमित व्याज किंवा उत्पन्न मिळत नाही. तुम्हाला मॅच्युरिटीवर सर्व पैसे मिळतात. नॉन-क्युम्युलेटिव्ह एफडीमध्ये पैसे सुरक्षित राहत असून तुम्हाला प्रत्येक महिन्याला व्याज मिळू शकते, ज्यांच्याकडे उत्पन्नाचे दुसरे कोणतेही साधन नसते त्यांच्यासाठी हे उत्पन्नाचे एक मोठे साधन बनेल.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts