Fixed Deposit : एफडीमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी खुशखबर! ‘या’ बँका देत आहेत सर्वाधिक व्याज

Fixed Deposit : सध्या गुंतवणुकीसाठी अनेक योजना उपलब्ध आहेत. अनेकजण सरकारी योजनांमध्ये गुंतवणूक करतात तर अनेकजण खासगी योजनांमध्ये गुंतवणूक करतात. शिवाय काहीजण बँक एफडीमध्ये गुंतवणूक करतात.

सध्या अशा काही बँका आहेत ज्या आपल्या ग्राहकांना गुंतवणुकीवर सर्वात जास्त व्याज देत आहेत. त्यामुळे तुमच्याकडे आता कमाई करण्याची उत्तम संधी आहे. अशातच आता जर तुम्ही अजूनही कोणत्या एफडीमध्ये गुंतवणूक केली नसेल तर लगेचच करा.

तुम्हीही मुदत ठेव ठेवली असेल किंवा मुदत ठेवींमध्ये गुंतवणूक करण्याच्या विचारात असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. आता तुम्हाला एक किंवा दोन नव्हे तर 10 बँका निवडक मुदत ठेवींवर सर्वात जास्त व्याजदर देत आहेत. सध्या अशा अनेक बँका आहेत ज्या FD वर 7 टक्क्यांपर्यंत व्याज देत आहेत.

मिळेल 7% पर्यंत व्याज

टॅक्स सेव्हिंग फिक्स्ड डिपॉझिट म्हणजेच FD वर एकूण 7 टक्क्यांपर्यंत व्याज उपलब्ध करून देण्यात आले आहे. समजा तुम्हाला टॅक्स सेव्हिंग एफडी घ्यायची असल्यास तर तुम्हाला 7 टक्के व्याजाचा लाभ घेता येईल. तसेच काही बँका टॅक्स सेव्हिंग एफडीवर 6.70%, 6.50%, 6.00% पर्यंत व्याज देत आहेत.

या बँका देत आहेत एफडीवर सर्वात जास्त व्याज

  • एचडीएफसी बँक – 7 टक्के व्याज
  • ICICI बँक – 7 टक्के व्याज
  • अॅक्सिस बँक – 7 टक्के व्याज
  • कॅनरा बँक – 6.70 टक्के व्याज
  • स्टेट बँक ऑफ इंडिया – 6.50 टक्के व्याज
  • युनियन बँक ऑफ इंडिया – 6.70 टक्के व्याज
  • पंजाब नॅशनल बँक – 6.50 टक्के व्याज
  • इंडियन बँक – 6.50 टक्के व्याज
  • बँक ऑफ इंडिया – 6 टक्के व्याज
  • बँक ऑफ बडोदा  – 6.50 टक्के व्याज

टॅक्स सेव्हिंग एफडी

अनेकांना टॅक्स सेव्हिंग एफडी म्हणजे काय हे माहिती नसते. या एफडीमध्ये, व्याज दर निश्चित करण्यात येतो. जो मॅच्युरिटीपर्यंत समान असतो. तसेच त्यांच्याकडे 5 वर्षांच्या लॉक-इन कालावधीसह एफडी असून इतर एफडी प्रमाणे, तुम्हाला 5 वर्षापूर्वी म्हणजेच मॅच्युरिटीपूर्वी टॅक्स सेव्हिंग एफडी काढता येत नाही. अनेक एफडी योजनांप्रमाणे, काही बँकाही ज्येष्ठ नागरिकांना कर बचतीच्या मुदत ठेवींवर जास्त व्याजदर देत आहेत. त्यामुळे जर तुम्हीही अजूनही या बँकांच्या एफडीमध्ये गुंतवणूक केली नसेल तर ती आजच करा.

Ahmednagarlive24 Office

Recent Posts