Flight Offer: तुम्हालाही स्वस्तात परदेशात (travel abroad)जायचे असेल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. एअरलाइन्स (Airlines) तुम्हाला एक उत्तम ऑफर देत आहेत.
याअंतर्गत तुम्ही फक्त 9 रुपयांमध्ये विमानाने प्रवास (travel by air for just 9 rupees) करू शकता. या अंतर्गत तुम्ही भारत (India) आणि व्हिएतनाम (Vietnam) दरम्यान फक्त 9 रुपयांमध्ये प्रवास करू शकता.
इंटरनॅशनल एअरलाइन (International airline) कंपनी व्हिएतजेटने (Vietjet) 9 रुपयांच्या हवाई तिकिटांची ऑफर आणली आहे, ज्याचे बुकिंग 4 ऑगस्टपासून सुरू झाले आहे.
ऑफर कशी मिळवायची?
ही ऑफर 26 ऑगस्टपर्यंत आहे. पण याअंतर्गत तुम्ही जर बुधवार, गुरुवार आणि शुक्रवारी तिकीट बुक केले तरच तुम्हाला ही संधी मिळेल.
दिल्लीतील पत्रकार परिषदेत ही माहिती देताना विमान कंपनी व्हिएतजेटने सांगितले की, व्हिएतजेट भारत ते व्हिएतनाम प्रवासासाठी 30,000 प्रमोशनल तिकिटे देत आहे. या तिकिटांच्या किमती 9 रुपये पासून सुरू होतात. ऑफर अंतर्गत, 15 ऑगस्ट 2022 ते 26 मार्च 2023 पर्यंतच्या प्रवासासाठी बुकिंग 4 ऑगस्ट ते 26 ऑगस्ट दरम्यान करता येईल.
एअरलाइन कंपनीच्या म्हणण्यानुसार, 4 ऑगस्ट ते 26 ऑगस्ट या कालावधीत प्रत्येक बुधवार, गुरुवार आणि शुक्रवारी तिकीट बुकिंग केल्यास प्रमोशनल तिकीट मिळू शकते.
रूट्स जाणून घ्या
व्हिएतजेट या विमान कंपनीचे व्यावसायिक संचालक जय एल लिंगेश्वर यांनी माहिती दिली आहे की, ‘व्हिएतजेट भारत आणि व्हिएतनाम दरम्यान 17 मार्गांसाठी थेट उड्डाणे चालवणार आहे.
पण यानंतरही, एअरलाइन्स भारताचे मुख्य गंतव्य दक्षिणपूर्व आशिया (Bali, Bangkok, Singapore, Kuala Lumpur), ईशान्य आशिया (Seoul, Busan, Tokyo, Osaka, Taipei) आणि आशिया पॅसिफिकशी जोडण्याचा विचार करत आहेत.
मोठ्या प्रमाणात अर्ज येत आहेत
ते असेही म्हणाले की , “पाच प्रमुख भारतीय शहरांतील प्रवासी आता दा नांग या सुंदर शहराला भेट देऊ शकतात आणि त्यानंतर होई एन, ह्यू इम्पीरियल, माय सोन अभयारण्य आणि सोन डूंग या जगातील सर्वात मोठ्या गुहासह जवळपासच्या पर्यटन स्थळांना भेट देऊ शकतात.
तुम्ही थेट उड्डाण घेऊ शकता. त्याचवेळी व्हिएतनामचे राजदूत फाम सॅन चाऊ म्हणाले की, व्हिएतनाम हे भारतीय पर्यटकांमध्ये एक मजबूत पर्यटन स्थळ म्हणून उदयास येत आहे. व्हिसा प्रक्रिया सुलभ करण्यात आली असून, यासाठी आता दूतावासात जाण्याची गरज नाही. कंपनीने सांगितले की, सध्या मोठ्या संख्येने व्हिएतनामला जाण्यासाठी मोठ्या संख्येने अर्ज येत आहेत.