Flipkart offers : देशात सण उत्सव सुरु आहेत. त्यामुळे अनेक ई कॉमर्स वेबसाईटवर (E commerce website) ऑफर (offers) सुरु झाल्या आहेत. फ्लिपकार्टवर देखील इलेक्ट्रॉनिक वस्तूंवर (Electronic products) सेल सुरु झाला आहे. तुम्हालाही iPhone 13 खरेदी करायचा असेल तर फ्लिपकार्टवर तुम्ही कमी पैशामध्ये खरेदी करू शकता.
11 ऑक्टोबरपासून फ्लिपकार्टवर दिवाळी सेल सुरू आहे, जो 16 ऑक्टोबरपर्यंत चालणार आहे. या काळात अनेक इलेक्ट्रॉनिक वस्तू स्वस्तात विकल्या जात आहेत. याशिवाय इतर वस्तूही सवलतीने खरेदी करता येतील.
या सेलमध्ये iPhone 13 (Flipkart iPhone 13 Sale) वर मोठ्या प्रमाणात सूटही दिली जात आहे. या अंतर्गत सुमारे 70 हजार रुपयांमध्ये येणारा iPhone 13 (iPhone 13) तुम्हाला फक्त 40 हजार रुपये मोजावा लागू शकतो.
iPhone 13 सवलत ऑफर
Flipkart दिवाळी सेलमध्ये iPhone 13 चा 128GB स्टोरेज प्रकार खूपच कमी किमतीत उपलब्ध आहे. येथे iPhone 13 9,910 रुपयांच्या डिस्काउंटसह विकला जात आहे. आयफोन 13 ची मूळ किंमत 69,990 रुपये आहे परंतु ती फ्लिपकार्टवर 59,990 रुपयांमध्ये सूचीबद्ध आहे.
आयफोन 13 एक्सचेंज ऑफर
iPhone 13 वर एक्सचेंज ऑफर देखील दिली जात आहे. या प्रकरणात, तुम्ही 16,900 रुपयांपर्यंत बचत करू शकता. या ऑफरचा पुरेपूर फायदा घेण्यासाठी, तुम्हाला नवीनतम मॉडेलमध्ये येणारा चांगल्या कंडिशनचा स्मार्टफोन एक्सचेंज करावा लागेल. अशाप्रकारे, तुम्हाला एक्सचेंज ऑफरचा पूर्ण फायदा मिळेल आणि iPhone 13 ची किंमत 59,990 रुपयांऐवजी 42,090 रुपये असू शकते.
iPhone 13 बँक ऑफर
आयफोन 13 वर अनेक बँक ऑफर्स देखील दिल्या जात आहेत. तुम्ही फ्लिपकार्ट अॅक्सिस बँक कार्डने पेमेंट केल्यास ५ टक्के सूट मिळेल. अशा परिस्थितीत तुम्हाला 2100 रुपयांपर्यंत सूट मिळू शकते.
याशिवाय, तुम्हाला 1000 रुपयांपर्यंतचे फ्लिपकार्ट गिफ्ट कार्ड मिळू शकते. जर तुम्ही एक्सचेंज ऑफरसह बँक ऑफर लागू केली तर iPhone 13 ची किंमत तुम्हाला 40 हजार रुपयांच्या जवळपास खर्च होऊ शकते.