Life Hacks : आपण नवीन घर बांधत असताना अनेक छोट्या छोट्या गोष्टींची काळजी घेतो. परंतु, अनेकजण घर बांधून झाल्यानंतर त्याची स्वच्छता राखत नाही. त्यामुळे ते वेळेपूर्वी खराब दिसू लागते. सफाईकडे दुर्लक्ष केल्याने अनेकांच्या घराच्या खिडक्या आणि दारांवर गंज येऊ लागतो.
अनेकजण गंज घालवण्यासाठी अनेक उपाय करतात. तरीही तो गंज निघत नाही. जर तुमच्याही घराच्या खिडक्या आणि दारांवर असणारा गंज जात नसेल तर काळजी करू नका, तुम्ही आता घरच्या घरी खिडक्या आणि दारांवरील गंज घालवू शकता.
बेकिंग सोड्याचा वापर
तुम्ही आता खिडक्या आणि दरवाजांवरील गंज काढण्यासाठी बेकिंग सोडा वापरू शकता. त्यासाठी तुम्हाला अगोदर बेकिंग सोडा पाण्यात मिसळून जाड पेस्ट तयार करावी लागणार आहे.
ही पेस्ट ज्या ठिकाणी गंज आहे त्या ठिकाणी लावून थोडा वेळ ठेवा. यानंतर, तुम्हाला टूथब्रशच्या मदतीने ते पूर्णपणे स्वच्छ करून घ्या. अशा प्रकारे तुम्ही सोप्या पद्धतीने खिडक्या आणि दरवाजांवरील गंज काढू शकता.
पांढऱ्या व्हिनेगरचा वापर
तसेच तुम्ही पांढरे व्हिनेगर वापरू शकता. ज्या ठिकाणी गंज आहे. त्या ठिकाणी पांढरा व्हिनेगर टाकावा. यानंतर तुम्हाला ते काही तास भिजवू द्यावे लागणार आहे. सगळ्यात शेवटी तुम्हाला ते व्हिनेगरमध्ये बुडलेल्या कापडाने स्वच्छ करावे लागणार आहे.
मीठ आणि लिंबू
मीठ आणि लिंबाच्या मदतीने तुम्ही गंज काढू शकता. त्यासाठी सगळ्यात अगोदर तुम्हाला गंजलेल्या भागात मीठ घालून एक थर बनवावा लागणार आहे. त्यानंतर त्यावर लिंबाचे काही थेंब टाकून ते सुमारे 3 तास सोडावे लागेल. तीन तासांनंतर तुम्हाला लिंबाची साल वापरून ते स्वच्छ करावे लागणार आहे. अशा प्रकारे तुम्ही सोप्या आणि सहजपणे काढू शकता.