राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबतीत असे म्हटले जात की ते अल्पावधितच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची स्टाइल उचलत आहेत. काही उदाहरणेही तशीच घडत असल्याचे दिसून येते.
अलीकडे असेच एक उदाहरण घडले आहे. शिंदे यांच्या सोशल मीडिया आकाऊंटवरून मोठ्या प्रमाणावर ट्रोलिंह होते. ही टीका टाळण्यासाठी शिंदे यांनी आपल्या सोशल मीडीया हँडल्सचे कमेट्स थेट बंद केली आहेत.
त्यामुळे तेथे कोणालाही काहीही कॉमेंट करता येत नाही. पूर्वी असाच प्रकार पतंप्रधान मोदी यांच्या बाबती घडला होता. त्यांच्या मन की बात किंवा अन्य कार्यक्रमांना डिसलाईक करण्याचे, ट्रोल करण्याचे प्रकार वाढले होते.
त्यानंतर याला प्रसिद्धही मिळत होती. त्यामुळे मोदी यांच्या हँडलवर ही सुविधा बंद करण्यात आली. आता तसाच निर्णय मुख्यमंत्री शिंदे यांच्या बाबतीत घेण्यात आला आहे. त्यामुळे शिंदे यांचा वाटचाल मोदी यांच्या स्टाईलने सुरू असल्याची चर्चा पुन्हा सुरू झाली आहे.