अहमदनगर Live24 टीम, 01 जानेवारी 2022 :- उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंग उन सगळ्यांनाच माहीत आहे. आपल्या देशात घातक हत्यार तयार करण्यावरून तो नेहमीच चर्चेत असतो. तसे तर उत्तर कोरियातील अनेक विचित्र कायदे तुम्हाला माहीत असतीलच.
पण तुम्हाला हे वाचून जास्त आश्चर्य वाटेल की, किम जोंग उनने त्याच्या वडिलांचा आणि आजोबांचा मृतदेह अजूनही सुरक्षित ठेवला आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, किम जोंग उनचे वडील किम जोंग इल आणि आजोबा किम जोंग इल सुंग यांचे मृतदेह कुमसुसन मेमोरिअल पॅलेसमध्ये सांभाळून ठेवण्यात आले आहेत हा पॅलेस खासकरून या दोन नेत्यांचे मृतदेह सुरक्षित ठेवण्यासाठी तयार करण्यात आला आहे.
इथे असा रिवाज आहे की, कुमसुसन पॅलेसच्या जवळ जाणाऱ्या प्रवाशांना या मृतदेहांसमोर तीन वेळा वाकावे लागते. कुमसुसन मेमोरीअल पॅलेसच्या सुरक्षेसाठी दिवसरात्र शेकडो जवान तैनात असतात.
इथे ठेवण्यात आलेल्या किम जोंग उनच्या वडिलांच्या आणि आजोबांच्या मृतदेहांची देखरेखीचं काम रशियातील लेनिन लॅब करते. लेनिन लॅबमधील वैज्ञानिकांच्या टीमनेच या नेत्यांचे मृतदेह संरक्षित करून ठेवले आहेत. याच लॅबच्या वैज्ञानिकांनी 1924 मध्ये रशियन नेते ब्लादिमीर लेनिन यांच्या मृतदेहाचे एम्बामिंग केली होती.
एम्बामिंगच्या माध्यमातून मृतदेहांना लवचिक आणि त्वचेला तरूण ठेवले जाते. मृतदेहांच्या एम्बामिंगसाठी अनेक महिन्यांचा कालावधी लागू शकतो.
याच प्रक्रियेच्या माध्यमातून किम जोंग उनचे वडील आणि त्याचे आजोबा यांचे मृतदेह संरक्षित करण्यात आले आहेत. किम जोंगच्या वडिलांचा आणि आजोबांचा मृतदेह दर दोन वर्षांनी एम्बामिंग केले जातात.
2016 मध्ये मॉस्कोमध्ये रिलीज करण्यात आलेल्या एका रिपोर्टनुसार, या नेत्यांच्या मृतदेहांच्या पहिल्या एम्बामिंगमद्ये साधारण 2 लाख डॉलर म्हणजे 1 कोटी 41 लाख रूपये खर्च आला होता.