‘महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची दोन वर्षांची शैक्षणिक फी माफ करा’

अहमदनगर Live24 टीम, 30 जून 2021 :- राज्याचे उच्च तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अभियांत्रिकी विद्यार्थ्यांची शैक्षणिक फी माफीची घोषणा केली.

तथापि कोरोनाचा फटका राज्यातील सर्वांनाच बसलेला असल्याने अभियांत्रिकी महाविद्यालयासोबतच इतर सर्व विद्यार्थ्यांचे २०२०-२१ व २०२१-२२ या दोन्हीही वर्षांची फी माफी करावी, अशी मागणी ग्राहक पंचायत महाराष्ट्र शाखा अकोलेच्या पदाधिकाऱ्यांनी केली.

या संदर्भातील निवेदनावर ग्राहक पंचायतचे जिल्हा उपाध्यक्ष मच्छिंद्र मंडलिक, कार्याध्यक्ष महेश नवले, तालुकाध्यक्ष दत्ता शेणकर, दत्ता रत्नपारखी, दिपक शेटे, रमेश राक्षे, भाऊसाहेब वाळूंज, राम भांगरे, रामहरी तिकांडे,

भाऊसाहेब गोर्डे, माधव तिटमे, भाऊसाहेब वाकचौरे, कैलास तळेकर, संजय वाकचौरे, दत्ता ताजणे, मच्छिंद्र चौधरी, राजेंद्र धायवट, शुभम खर्डे, ज्ञानेश्वर पुंडे, रामदास पांडे, सुदाम मंडलिक, राम रुद्रे, बाळासाहेब बनकर, प्रतिभा सूर्यवंशी, शोभा रातखिळे, शारदा चौधरी, सखाहरी पांडे,

सलिम पठाण, शबीर शेख आदींच्या सह्या आहेत. या निवेदनाच्या प्रत राज्यपाल भगतसिंह कोशारी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड, वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांना पाठवल्याची माहिती तालुका सचिव दत्ता रत्नपारखी यांनी दिली.

निवेदनात म्हटले आहे, कोरोना महामारीमुळे दोन वर्षांपासून पालक व विद्यार्थी अनेक संकटाना तोंड देत असून आर्थिकदृष्ट्या संकटात सापडले आहेत. शासनाने याचा विचार करावा.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

Recent Posts