अहमदनगर Live24 टीम, 12 एप्रिल 2021 :- श्रीगोंदा तालुक्यातील शेळकेवाडी येथील उच्चशिक्षित तरुण सुशीलकुमार शेळके आणि वडील शिवाजी शेळके यांनी सुरू केलेल्या जिरेनियम शेतीला महाराष्ट्र विधानसभेचे माजी उपाध्यक्ष विजयराव औटी यांनी भेट देऊन शेतकऱ्यांशी सुसंवाद साधला.
पारंपारिक शेतीला फाटा देत तरुण शेतकरी आपल्या शेतामध्ये वेगवेगळे प्रयोग राबवताना दिसत आहेत. असाच एक नवा प्रयोग शेळके यांनी जिरेनियम शेतीच्या माध्यमातून केला आहे . या शेतीला औटी यांनी भेट देऊन जिरेनियम शेतीविषयी माहिती घेतली .
यावेळी माजी आमदार आणि माजी विधानसभा उपाध्यक्ष विजयराव औटी यांनी तरुण शेतकऱ्यांनी पारंपरिक शेतीऐवजी नवनवीन तंत्रज्ञान शेतामध्ये वापरून ,जगात काय चाललंय याचा अभ्यास करून शेती केल्यास चांगले उत्पन्न मिळेल असा शेतकऱ्यांना सल्ला दिला .
करोनापासून बचावासाठी सर्वांनी घरात रहावे .आपापल्या शेतामध्ये काम करावे. गर्दी जमेल अशा कार्यक्रमांना उपस्थित राहू नये. सरकारच्या नियमांचे पालन करून या कोरोना लढाईमध्ये सरकारला साथ द्यावी, असे औटी म्हणाले .
यावेळी शिवसेना पारनेर तालुका उपाध्यक्ष रामदास भोसले , श्रीगोंदा भाजपा युवा अध्यक्ष शांताराम वाबळे, अरुण शेळके, मारुती शेळके , वीज कर्मचारी अक्षय मापारी उपस्थित होते. एकरी खर्च सत्तरहजार रुपये येतो .
जिरेनियमचे एकरी उत्पन्न चार लाखापर्यंत जाते. एकदा लागवड केल्यानंतर हे पीक तीन वर्ष चालते. यासाठी डिस्टिलेशन युनिटची गरज आहे.
या युनिटची किंमत दीड लाखापासून सुरू होते. कृषी विभाग व कृषी सहायक अशोक नेरलेकर यांचे वेळोवेळी मार्गदर्शन आम्हाला लाभले आहे.
शिवाजी शेळके ( ८०५५०३०६०६) शेतकरी औषधी व सुगंधी जिरेनियम शेती तरूण शेतकऱ्यांना फायद्याची असून अर्थार्जनाचे उत्तम साधन ठरत आहे . कमी खर्चात व कमी कालावधीत जास्त उत्पन्न देणारे हे पिक आहे .