अहमदनगर Live24 टीम, 8 मे 2021 :- भाजपच्या महाराष्ट्र प्रदेश किसान मोर्चाच्या उपाध्यक्षपदी माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांची निवड करण्यात आली आहे. निवडीचे पत्र माजी कृषी मंत्री अनिल बोंडे यांनी दिले आहे.
मुरकुटे यांच्या निवडीमुळे नेवासे तालुक्यातील कार्यकर्त्यंाना बळ मिळाले असल्याचे मानले जाते. माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे हे कृषी पदवीधर आहे.
त्यांची भाजपच्या महाराष्ट्र प्रदेश किसान मोर्चाच्या उपाध्यक्षपदी निवड झाल्याने शेतकऱ्यांना विविध अडचणीत मदत होईल. या उद्देशाने ही निवड करण्यात आली आहे, असे नियुक्तीपत्रात म्हटले आहे.
नेवासे विधानसभा मतदारसंघात पक्ष कार्यकर्ते व संघटनात्मक, शेतकरी हितासाठी निवड महत्त्वाची मानली जाते. माजी आमदार मुरकुटे यांच्या निवडीबद्दल कार्यकर्त्यांनी स्वागत केले.