Maharashtra news : काँग्रेसमधील नाराज असलेल्या २३ प्रमुख नेत्यांमध्ये समावेश अललेले महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पक्षाबद्दल पुन्हा एकदा आपली मते स्पष्टपणे मांडली आहेत.
शिर्डीत प्रदेश काँग्रेसची नवसंकल्प कार्यशाळा झाली. यानिमित्त एका मुलाखतीत चव्हाण यांनी काँग्रेस आणि पक्षनेतृत्व याबद्दल स्पष्ट मते मांडली आहे. ‘गेल्या चार वर्षांत पक्षाचे नेते राहुल गांधी यांच्याशी आपली भेट होऊ शकली नाही’, असा खबळजनक दावाही त्यांनी केला.
काँग्रेसला सध्या गरज आहे ती निवडून आलेल्या पूर्णवेळ अध्यक्षांची; मग ते कोणत्याही परिवाराचे असोत, असे सांगून चव्हाण म्हणाले. मी जेव्हाही दिल्लीत असतो तेव्हा अधूनमधून डॉ. मनमोहन सिंग यांना भेटतो. पण त्यांची प्रकृती आता पूर्वीसारखी राहिली नाही.
त्यांनी नेहमीच आदरातिथ्याची भावना जपली आहे आणि नेहमी बोलण्यासाठी तयार आहे. मी जेव्हा कधी वेळ मागितली तेव्हा मी सोनिया गांधींनाही भेटतो. पण बऱ्याच दिवसांपासून मी राहुल गांधींना भेटलो नाही… मला वाटतं त्यांना भेटून चार वर्षे झाली आहेत. पक्षनेतृत्वाला भेटायला हवी तेव्हा उपलब्ध होत नसल्याची तक्रार आहे.