ताज्या बातम्या

Online Fraud : बँकेची ऑनलाईन तक्रार करताना झाली फसवणूक, क्षणातच खात्यातून गायब झाले लाखो रुपये

Online Fraud : जसजसे तंत्रज्ञान प्रगतीशील होत आहे तसतसे अनेक आर्थिक घोटाळे होत आहे. सध्या या घटनांमधून वाढ झाली असून फसवणूक करणारे वेगवेगळ्या पद्धतीने नागरिकांची फसवणूक करत आहेत. नागरिकही त्याला बळी पडत आहेत.

काहींची हजारो तर काहींची लाखो रुपयांची फसवणूक होत आहे. केवायसी, एखादा मेसेज किंवा बनावट लॉटरी सारख्या गोष्टींमुळे फसवणूक होत आहे. याबाबत सतर्क राहणे खूप गरजेचे आहे.

अनेकजण निष्काळजीपणामुळे ऑनलाइन फसवणुकीचे बळी ठरत आहेत, परंतु,यावेळी बँकेच्या माजी कर्मचाऱ्याच्या खात्यावरच डल्ला मारल्याची घटना घडली आहे त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. संबंधित महिलेने पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला असून पोलीस तपास करत आहेत. तुमच्या थोड्याशा निष्काळजीपणामुळे तुमची सहज फसवणूक होऊ शकते.

बँकेच्या तक्रारीसाठी ऑनलाइन गेली होती महिला

पुष्पलता प्रदीप असे फसवणूक झालेल्या माजी बँक कर्मचाऱ्याचे नाव आहे. ती महिला कर्मचारी भविष्य निर्वाह निधी आणि मुदत ठेवींशी निगडित ऑनलाइन तक्रार करत होती. युनियन बँकेच्या वेबसाइटवर तक्रार करताना त्या महिलेला ऑनलाइन दिलेल्या नंबरवर दोन फोन आले. त्यानंतर तिला व्हॉट्सअॅपवर एक लिंक पाठवली.

लिंक ओपन करताना फसवणूक

फसवणूक करणाऱ्यांनी तिला बँक कर्मचारी असल्याचे सांगून एक लिंक पाठवली. ती लिंक ओपन करून अॅप डाउनलोड करण्यास सांगून तक्रार करण्याचा सल्ला दिला. या संपूर्ण प्रक्रियेत तिच्याकडून सर्व माहिती आणि इंटरनेट बँकिंग तपशील घेतला आणि काही वेळातच त्यांना आपली फसवणूक झाल्याचे समजले.

जनजागृती गरजेची

त्या महिलेने त्या फसवणूकदारांना बँकेचे कर्मचारी समजत त्यांच्यावर विश्वास ठेवून अॅप इन्स्टॉल केले. या अॅपमध्ये दिलेल्या माहितीच्या मदतीने त्यांचे अकाउंट हॅक केले असल्याचे समोर आले आहे.

दरम्यान आता हे लक्षात ठेवा की कोणत्याही नंबरवरून येणाऱ्या संदेशावर विश्वास ठेवण्यापूर्वी त्याची सत्यता तपासा. कारण कोणतीच बँक कोणतेही अॅप डाउनलोड करण्यास किंवा तुमची वैयक्तिक माहिती मागत नाही.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office
Tags: Online Fraud

Recent Posts