ताज्या बातम्या

ITR Filing Last Date: ITR भरण्यासाठी 31 जुलैपर्यंत मोफत संधी, अन्यथा 1 ऑगस्टपासून भरावा लागेल इतका दंड…

ITR Filing Last Date: आर्थिक वर्ष 2021-22 (Financial Year 2021-22) साठी प्राप्तिकर रिटर्न (income tax return) भरण्याची शेवटची तारीख आता अगदी जवळ आली आहे. तुम्ही अजून ITR भरला नसेल, तर विलंब न करता हे काम पूर्ण करा. आयटीआर भरणे अनेक बाबतीत फायदेशीर ठरू शकते.

त्याच वेळी, वेळेवर ITR न भरणे देखील एक समस्या बनू शकते. ITR दाखल करण्याची अंतिम तारीख (ITR Filing Deadline) 31 जुलै 2022 आहे. म्हणजे तुमच्याकडे आयटीआर फाइल करण्यासाठी मोजून फक्त तीन दिवस शिल्लक आहेत.

अजूनही इतक्या कोटी लोकांनी आयटीआर भरलेला नाही –

आयकर विभागाने (Income Tax Department) सांगितले की, आतापर्यंत 3 कोटींहून अधिक लोकांनी रिटर्न भरले आहेत. मात्र 31 जुलैपर्यंत सुमारे 7 कोटी आयटीआर दाखल करायचे आहेत. अशा परिस्थितीत जर शेवटच्या दिवसांत सुमारे 4.5 कोटी लोकांनी रिटर्न फाइल केले तर रिटर्न फाइलिंग पोर्टलवरील भार वाढू शकतो आणि सिस्टम मंद होऊ शकते. अशा समस्या टाळण्यासाठी, तुम्ही उशीर न करता तुमचे रिटर्न भरणे महत्त्वाचे आहे. रिटर्न भरण्यासाठी शेवटच्या तारखेची वाट पाहू नये, असेही कर तज्ज्ञांचे मत आहे.

ITR भरण्यास उशीर झाल्यास असा दंड आकारला जाईल –

वेळेवर आयटीआर भरण्याचे अनेक फायदे आहेत. तुमचा इन्कम टॅक्स रिफंड (Income Tax Refund) झाला असेल, तर तुम्ही जितक्या लवकर इन्कम टॅक्स रिटर्न फाइल कराल तितक्या लवकर रिफंड तुमच्या खात्यात येईल. शिवाय, शेवटच्या तारखेला रिटर्न भरताना अनेकदा चुका होतात. तुमचा रिटर्न वेळेवर भरून तुम्ही हे टाळू शकता.

अंतिम मुदतीनंतर ITR दाखल केल्यास दंड आकारला जाऊ शकतो. अंतिम मुदतीनंतर रिटर्न भरण्यासाठी, 5 लाख किंवा त्यापेक्षा कमी उत्पन्नावर 1,000 रुपये विलंब शुल्क आकारले जाईल. 5 लाखांपेक्षा जास्त उत्पन्नासाठी विलंब शुल्क 5,000 रुपये असेल. ही रक्कम 10,000 रुपयांपर्यंत जाऊ शकते.

मुदत वाढवण्याचा हेतू नाही –

इन्कम टॅक्स रिटर्न भरण्यासाठी आयटीआर फाइलिंग डेडलाइनमध्ये (ITR Filing Deadline) 3 दिवस उरले आहेत. लोकांची अपेक्षा आहे की, सरकार (government) दरवेळेप्रमाणे या वर्षीही अंतिम मुदत (ITR फाइलिंग डेडलाइन एक्स्टेंशन) वाढवेल. मात्र, यावेळी आयकर विवरणपत्र भरण्याची अंतिम तारीख वाढवण्याचा विचार करत नसल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे.

पीटीआय या वृत्तसंस्थेनुसार, सरकार यापुढे मुदत वाढवणार नाही. महसूल सचिवांच्या हवाल्याने पीटीआयने हे वृत्त दिले आहे. पीटीआयच्या म्हणण्यानुसार, महसूल सचिवांनी सांगितले की सरकार आयकर रिटर्न भरण्याची अंतिम मुदत 31 जुलैच्या पुढे वाढवण्याचा विचार करत नाही.

आयकर रिटर्न स्वतः कसे भरायचे –

आयटीआर भरण्यासाठी तुम्हाला युजर आयडी आणि पासवर्डच्या मदतीने आयकर विभागाच्या https://www.incometax.gov.in/iec/foportal वेबसाइटवर लॉग इन करावे लागेल. आयकर रिटर्न (ITR) भरण्यासाठी, तुम्हाला पॅन कार्ड, आधार कार्ड, बँक खाते क्रमांक, गुंतवणूक तपशील आणि फॉर्म 16 किंवा फॉर्म 26AS आवश्यक असेल. यावेळी आयकर विभागाने एआयएसशी डेटा जुळणे अनिवार्य केले आहे. नंतर, आयकर विभाग तुम्हाला नोटीस देत नाही, म्हणून AIS आगाऊ डाउनलोड करा.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts