Free Government Scheme: सरकारच्या ‘या’ तीन योजनांमधून मिळतात पैसे! फक्त आवश्यक असते आधार कार्ड

Free Government Scheme:- सरकारच्या माध्यमातून समाजातील वेगवेगळ्या घटकांकरिता अनेक प्रकारच्या योजना राबवल्या जातात. त्यामध्ये काही योजना या व्यवसाय उभारणी करिता आर्थिक मदत करतात. तर काही कृषी क्षेत्रासाठी शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट होण्याच्या दृष्टिकोनातून खूप महत्वाचे आहेत.

परंतु सरकारच्या अशा काही योजना देखील आहेत ज्यामधून  आपल्याला पैसे मिळू शकतात. तसे पाहायला गेले तर सरकारच्या माध्यमातून अनेक प्रकारच्या योजना राबवल्या जात असतात. परंतु बऱ्याचदा आपल्याला पुरेशा योजनांची माहिती होत नाही व काही मोजक्या योजना आपल्याला माहिती असतात.

परंतु काही योजनांच्या माध्यमातून आपल्याला चांगल्या प्रकारची रक्कम देखील मिळते. एवढेच नाही तर यामध्ये काही सुविधा देखील मोफत दिल्या जातात. त्यामुळे या लेखामध्ये आपण सरकारच्या अशा कोणत्या प्रमुख योजना आहे ज्यातून आपल्याला लाखो रुपये मिळू शकतात? त्याबद्दल माहिती घेणार आहोत.

 सरकारच्या महत्त्वाच्या योजना

1- स्किल इंडिया योजना किंवा प्रधानमंत्री कौशल विकास

योजना समजा तुम्ही बेरोजगार आहात तुम्हाला कुठल्याही प्रकारची नोकरी वगैरे नाही तर तुमच्यासाठी ही योजना खूप महत्त्वाची ठरू शकते व या योजनेचे माध्यमातून तुम्हाला अनेक नवनवीन कौशल्य शिकायची संधी मिळते.

तुम्ही जर आर्थिक दृष्ट्या पुरेसे स्थिर नसेल तर नवीन कौशल्य शिकण्यासाठी संस्थेत किंवा कोचिंग सेंटर मध्ये दाखल होण्याकरिता  महत्वाची अशी ही योजना असून  या योजनेच्या माध्यमातून सरकार मोफत कौशल्य प्रशिक्षण देते. या योजनेच्या माध्यमातून तीन महिने ते सहा महिन्यांपर्यंतचे कोर्सेस तुम्हाला शिकायला मिळतात आणि या कोर्सचे सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे सर्व कोर्स तुम्हाला नोकरीसाठी खूप मदत करतात

किंवा या कोर्सेस मधून तुम्ही नवनवीन कौशल्य शिकून एखादा चांगला व्यवसायाची निवड करून व्यवसाय देखील करता येतो.जर आपण या योजनेच्या माध्यमातून शिकवले जाणारे कोर्सेसचा विचार केला तर यामध्ये डिजिटल मार्केटिंग, मेकअप आर्टिस्ट तसेच प्रोग्रामिंग, ग्राफिक डिझायनिंग तसेच संगणक प्रशिक्षण या माध्यमातून दिले जाते.

विशेष म्हणजे हे सर्व कोर्स तुम्हाला कुठल्याही पैशांशिवाय शिकता येतात. महत्वाचे म्हणजे हे कोर्सेस पूर्ण केल्यानंतर तुम्हाला सरकार प्रमाणपत्र देते व त्यासोबत पाच ते दहा हजार रुपये देखील देते. या माध्यमातून तुम्हाला प्लेसमेंटची सुविधा देखील दिली जाते. जे सरकारने काही कंपन्यांशी करार केला असून हे कौशल्य प्रशिक्षण घेतल्यानंतर तुम्हाला तुमच्या कौशल्यानुसार या कंपन्यांमध्ये नोकरी देखील मिळते.

2- श्रम कार्ड योजना ई श्रम कार्ड योजना योग्य प्रकारे राबवता यावी याकरिता सरकारने ई श्रम पोर्टल देखील सुरू केले आहे. या पोर्टलच्या माध्यमातून आतापर्यंत कोट्यावधी लोकांनी नोंदणी केली असून यामध्ये महिलांची संख्या मोठी आहे. उपलब्ध आकडेवारीनुसार या पोर्टलच्या माध्यमातून 15% महिला व 47 टक्के पुरुषांनी नोंदणी केलेली आहे.

या योजनेच्या माध्यमातून ई श्रम कार्ड बनवलेल्या कामगारांना केंद्राने राज्य सरकारच्या विविध योजनांचा लाभ मिळवणे सोपे होते. या योजनेअंतर्गत ज्या कामगारांनी नोंदणी केलेली आहे त्यांना वयाच्या 60 वर्षानंतर प्रत्येक महिन्याला पेन्शनची रक्कम मिळते व एवढेच नाही तर नोंदणीकृत कामगाराला दोन लाख रुपयापर्यंतचा अपघात विमा संरक्षण देखील या माध्यमातून मिळते. एखादा कामगार जर अपंग झाला तर त्याला एक लाख रुपये दिले जातात.

तसेच या अंतर्गत नोंदणी केलेल्या कामगारांना घर बांधण्याकरिता निधी दिला जातो. तसेच या पोर्टलच्या माध्यमातून नोंदणी केलेल्या कामगारांना त्यांच्या कामानुसार लागणारी उपकरणे देखील दिली जातात. विशेष म्हणजे या योजनेअंतर्गत समाविष्ट असलेल्या लाभार्थ्यांना शासनाच्या श्रमयोगी मानधन योजना तसेच राष्ट्रीय पेन्शन योजना इत्यादी योजनांचा देखील लाभ दिला जातो.

3- पीएम सुरक्षा विमा योजना ही योजना गरीब लोकांसाठी खूप महत्त्वाचे असून योजनेमध्ये जर तुम्हाला सहभागी व्हायचे असेल तर तुम्हाला वर्षाला फक्त 12 रुपये यामध्ये गुंतवावे लागतात. त्यानंतर मात्र तुम्ही दोन लाख रुपयांच्या विमा संरक्षणासाठी पात्र होता. तसेच या योजनेमध्ये सहभागी झाल्यानंतर अनेक फायदे देखील अर्जदाराला मिळत असतात.

पंतप्रधान सुरक्षा विमा योजनेमध्ये सहभागी झाल्यानंतर जर एखाद्याचा गंभीर अपघात किंवा अपघातात मृत्यू झाला तर या योजनेअंतर्गत दोन लाख रुपयांचे विमा संरक्षण देखील मिळते. प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेमध्ये सहभागी झाल्यानंतर वर्षाला फक्त बारा रुपये यामध्ये तुम्हाला जमा करावे लागतात.

18 ते 70 वर्षाच्या वयोगटातील व्यक्ती या योजनेसाठी पात्र ठरतात. या योजनेच्या अंतर्गत जर एखाद्याचा अपघाती मृत्यू किंवा संपूर्ण अपंगत्व आले तर विमाधारकाला दोन लाख रुपये देण्याची देखील तरतूद करण्यात आलेली आहे.

अंशत: अपंगत्व आले असेल तर एक लाख रुपयांची रक्कम या माध्यमातून मिळते. तुम्हाला जर या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर बचत खात्याचा तपशील देणे गरजेचे असते व त्या नंतर प्रत्येक महिन्याला तुमच्या खात्यातून एक रुपये प्रीमियम कापला जातो.

Ajay Patil

Recent Posts