ताज्या बातम्या

Free Internet : ऑफर असावी तर अशी! वर्षभर मोफत वापरता येणार हाय-स्पीड इंटरनेट, ‘ही’ कंपनी देत आहे संधी

Free Internet : भारतीय टेलिकॉम कंपन्या आपल्या ग्राहकांसाठी सतत नवनवीन आणि शानदार ऑफर घेऊन येत असतात. ज्याचा ग्राहकांनाही खूप मोठा फायदा होतो. अशीच एक ऑफर बीएसएनएलने आपल्या ग्राहकांसाठी आणली आहे.

या ऑफरमध्ये कंपनी ग्राहकांना वर्षभर मोफत हाय-स्पीड इंटरनेट वापरण्याची संधी देत आहे. दरम्यान हे लक्षात घ्या की प्रत्येक ग्राहकांसाठी ही ऑफर नाही. काही ठराविक ग्राहकांना या संधीचा लाभ घेता येईल. कसे ते जाणून घ्या.

या ग्राहकांना होणार फायदा

BSNL कडून कॉपर कनेक्शनवर 250 रुपये इन्स्टॉलेशन चार्ज माफ करण्यात आला आहे. तसेच कंपनीकडून भारत फायबर कनेक्शन लावण्याचे 500 रुपये शुल्क माफ करण्यात आले आहे. या निर्णयामुळे बीएसएनएलच्या ग्राहक संख्येत वाढ होईल. अनेक राज्यांमध्ये BSNL भारत फायबर प्लॅन प्रत्येक महिन्यात 329 रुपयांपासून सुरू होतात.

पहा फायदे

ग्राहकांना 329 रुपयांच्या या प्लॅनमध्ये 1TB डेटासह 20 Mbps पर्यंत स्पीड मिळेल. तसेच डेटा मर्यादा संपल्यानंतर इंटरनेटचा वेग कमी होऊन ४ एमबीपीएस होईल. तसेच कंपनीकडे काही स्वस्तात प्लॅन आहेत. ग्रामीण भागात राहत असणाऱ्या ग्राहकांसाठी काही खास प्लॅन आहेत ज्यांना परवडणाऱ्या किमतीत चांगला डेटा आणि हाय-स्पीड कनेक्शन पाहिजे असेल ते हे रिचार्ज प्लॅन घेऊ शकतात.

कंपनीचा फायबर रुरल होम वायफाय प्लॅन 1TB डेटासह 30 Mbps पर्यंत स्पीडसह येत असून हा प्लॅन केवळ देशातील ग्रामीण भागात राहणाऱ्या लोकांसाठी उपलब्ध असणार आहे. हे लक्षात घ्या 329 रुपयांचा प्लॅन प्रत्येकासाठी उपलब्ध नाही. देशातील काही निवडक शहरांतील नवीन ग्राहकच कंपनीचा हा प्लॅन खरेदी करू शकतात.

मोफत मिळणार राउटर

ग्राहक कमीत कमी सहा महिन्यांसाठी प्लॅन खरेदी करतील तेव्हा त्यांना BSNL मोफत सिंगल-बँड ONT Wi-Fi राउटर मिळेल. इतकेच नाही तर 12 महिन्यांसाठी प्लॅन खरेदी करणाऱ्या ग्राहकांना ड्युअल-बँड वाय-फाय राउटर मोफत मिळणार आहे.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts