Free Ration Scheme : देशात सर्वत्र दिवाळी (Diwali) मोठ्या उत्साहात साजरी होत आहे. अशा वेळी मोदी सरकार (Modi Goverment) गरीब जनतेसाठी मोफत रेशन देत आहे. मात्र या सुविधेमध्ये अनेक अडचणी येत आहेत.
यामुळे आता UIDAI ने देशातील करोडो लोकांना एक मोठी भेट (Big Gift) दिली आहे. देशातील आधार जारी करणारी संस्था UIDAI ने म्हटले आहे की, आता तुम्ही देशभरात आधारद्वारे रेशन घेऊ शकता आणि यासाठी तुम्हाला अजिबात काळजी करण्याची गरज नाही. UIDAI ने ट्विट करून याबाबत माहिती दिली आहे.
UIDAI ने ट्विट केले आहे
UIDAI ने आपल्या अधिकृत ट्विटमध्ये (Tweet) लिहिले आहे की, आता तुम्ही आधारद्वारे संपूर्ण देशात कुठेही रेशन घेऊ शकता, परंतु यासाठी तुमचे आधार अपडेट करणे आवश्यक आहे. वन नेशन वन आधार कार्यक्रमाद्वारे तुम्ही आधार कार्डवरून देशभरात रेशन घेऊ शकता.
जवळच्या आधार केंद्रावर संपर्क साधा
तुमचे आधार कार्ड अपडेट करण्यासाठी तुम्ही तुमच्या जवळच्या आधार केंद्राशी संपर्क साधू शकता. याशिवाय, अधिकृत वेबसाइट https://bhuvan.nrsc.gov.in/aadhaar/ द्वारे देखील आधार केंद्र शोधता येईल.
तुम्ही टोल फ्री क्रमांकावरही संपर्क साधू शकता
आजच्या काळात तुम्ही तुमच्या घरातील कामापासून ते बँकेपर्यंतची सर्व कामे आधारद्वारे करता, त्यामुळे ते अपडेट ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. तुम्हाला आधारशी संबंधित कोणत्याही प्रकारची समस्या असल्यास, तुम्ही टोल फ्री क्रमांक 1947 वर देखील संपर्क साधू शकता. येथे तुम्हाला आधारशी संबंधित सर्व माहिती मिळेल.