अहमदनगर Live24 टीम, 29 जून 2021 :- नगर – सध्याच्या कोरोनाच्या काळात प्रत्येकाची प्रतिकार शक्ती वाढावी व कोरोना पासून संरक्षण व्हावे म्हणून योग विद्या धाम अहमदनगरच्या वतीने दिनांक 1 जुलै ते 30 जुलै पर्यंत योगा प्रवेश वर्ग सकाळी 6 ते 7 व दुपारी 5ते 6 या वेळेत मोफत आयोजित करण्यात आले आहेत अशी माहिती योग विद्या धाम चे अध्यक्ष डॉ सुंदर गोरे यांनी दिली.
हे योगाचे वर्ग ऑनलाईन व योग भवन, चिंतामणी कॉलनी, भिस्तबाग रोड , योग भवन, सिध्दबाग तसेच नवले हॉल, गुलमोहर रोड येथे ऑफलाईन पद्धतीने घेतले जाणार आहेत. या वर्गात वेगवेगळ्या प्रकारच्या 39 योगासने, 12 प्रकारच्या पूरक हालचाली,
सूर्यनमस्कार व 6 प्रकारचा श्वसनाचे अभ्यास शिकवले जाणार आहेत. सध्याच्या कोरोना महामारीच्या काळात आपले आरोग्य चांगले राहण्यासाठी व प्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी हे वर्ग अत्यंत उपयुक्त आहेत.
तरी या संधीचा जास्तीत जास्त लोकांनी फायदा घ्यावा असे आवाहन योग विद्या धाम चे राजन कुमार यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी संजय सुरसे मो.9823974480 किंवा अनिरुद्ध भागवत मो. 9423162438 यांचेशी संपंर्क साधावा.