सोमवारपासून झेडपीत केवळ 50 टक्के कर्मचारीच उपस्थित राहणार

अहमदनगर Live24 टीम, 19 मार्च 2021:-जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी कोरोना प्रतिबंधक उपाययोजना कडक केल्या आहेत.

तसा अध्यादेश जारी केला आहे. या अध्यादेशामुळेच जिल्हा परिषदेतील कर्मचाऱ्यांची उपस्थिती 50 टक्के करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.

दरम्यान, या संदर्भात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, जिल्हा परिषदेतील कामकाज 50 टक्के कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

त्याची अंमलबजावणी सोमवारपासून केली जाणार आहे. 50 टक्के कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत 31 मार्चपर्यंत कामकाज सुरू राहणार आहे.

जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी प्रतिबंधक उपाययोजना काटेकोरपणे लागू करण्याचे आदेश दिले आहेत. त्याचे पालन करीत जिल्हा परिषदेत 50 टक्के कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत कामकाज करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

Recent Posts