दाखले देण्यास महाविद्यालयाकडून, विद्यार्थ्यांचा ठिय्या

अहमदनगर Live24 टीम, 25 ऑगस्ट 2021 :- देवळाली प्रवरा येथील श्री छत्रपती शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना फी भरून घेतल्या शिवाय दाखले मिळत नसल्याने विद्यार्थ्यांसह सामाजिक कार्यकर्त्यांनी ठिय्या आंदोलन केले.

छत्रपती माध्यमिक विद्यालय येथील आय टी विषयातील १२ वी उत्तीर्ण विद्यार्थी पुढील शिक्षणासाठी महाविद्यालयाकडे चकरा मारीत असून केवळ आय टी विषयाची फी भरायची बाकी राहिल्याने विद्यालय विद्यार्थ्यांना दाखले दिले जात नाही.

त्यामुळे एकीकडे कोरोनामुळे पालक फी भरू शकत नाही तर दुसरीकडे पुढील शिक्षणाची ऍडमिशनची मुदत संपत आलेने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाण्याची भीती निर्माण झाली आहे.

मुलांसाठी इकडे आड आणि तिकडे विहीर अशी अवस्था निर्माण झाल्याने विद्यार्थ्यांनी ठिय्या आंदोलन केले. यावेळी आप्पासाहेब ढुस, ऋषिकेश संसारे आदिंसह सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी शाळेचे प्राचार्य श्री. गुंड सर यांनी ज्या विद्यार्थ्यांना शक्य असेल तर त्यांनी फी भरावी अन्यथा आम्ही आमच्या पगारातून फी भरू अशी भूमिका घेतली. विद्यार्थ्यांना दाखले देण्यास तयार असल्याचे यावेळी आश्वासन दिले.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

Recent Posts