अहमदनगर Live24 टीम, 17 मार्च 2021:-आज जिल्ह्यात तब्बल 611 रुग्ण समोर आले असून त्यात अहमदनगर तालुक्यात सर्वाधीक 226, राहाता तालुक्यात 83, संगमनेर तालुक्यात 75 तर कोपरगाव तालुक्यात 73 रुग्ण आढळले आहेत.
गेल्या सतरा दिवसांत जिल्ह्याची सरासरी दररोज एक टप्पा वर जात आज थेट 358 रुग्ण दररोज या गतीवर जावून पोहोचली आहे. संगमनेर तालुक्यातही आज विक्रमी संख्येने रुग्ण आढळल्याने तालुका आता 7 हजार 542 वर पोहोचला आहे.
तालुक्यात सध्या 389 रुग्ण सक्रीय आहेत. जिल्ह्यातील कोविड रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होत असून आज (ता.17) जिल्ह्यात मार्चमधील विक्रमी रुग्ण आढळून आले आहेत.
अहमदनगर, संगमनेर, राहाता, कोपरगाव व श्रीरामपूर या पाच तालुक्यांमध्येच मार्च महिन्यातील तब्बल 72.5 टक्के रुग्ण समोर आले आहेत.
त्यामुळे जिल्हा पुन्हा एकदा कठोर निर्बंधांच्या उंबरठ्यावर उभा राहीला आहे. जिल्ह्याची आजच्या स्थितीत एकूण रुग्णसंख्या 82 हजार 74 झाली असून
आजवर जिल्ह्यातील 77 हजार 925 रुग्णांनी उपचार पूर्ण केले आहेत. तसेच 2 हजार 667 रुग्णांवर उपचार सुरु असून आत्तापर्यंत जिल्ह्यातील 1 हजार 182 रुग्णांचा कोविडने बळी घेतला आहे.
जिल्ह्यात आज 611 रुग्णांची वाढ झालेली असतांना जवळपास त्यापेक्षा निम्म्या म्हणजे 323 रुग्णांना आज घरी सोडण्यात आले. जिल्ह्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण पुन्हा खालावले असून सध्या ही सरासरी 94.94 टक्क्यांवर आली आहे.