ताज्या बातम्या

शिंदे सरकारचे भवितव्य आज, पहा कोणत्या मुद्द्यांवर होणार सुनावणी

Maharashtra News:महाराष्ट्रातील सत्तासंर्घषानंतर निर्माण झालेल्या राजकीय आणि कायदेशीर पेचावर आज सुप्रिम कोर्टात सुनावणी होणार आहे. देशाचे सरन्यायाधीश रमण्णा यांच्या अध्यक्षतेखालील तीन सदस्यीय खंडपीठ या प्रकरणाची सुनावणी करणार आहे.

या मुद्द्यांवर सुनावणी…

  • उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्यावरील अविश्वास प्रस्ताव वैध आहे की नाही, यावर निर्णय.
  • एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेतील १६ बंडखोर आमदारांवर कारवाईची मागणी.
  • गटनेता, प्रतोद म्हणून विधानसभा आणि लोकसभेत शिंदेगटाच्या नेमणुकांना शिवसेनेकडून आव्हान.
  • शिवसेनेच्या पक्षाचं चिन्हावर दोन्ही बाजूंचा दावा, निवडणुक आयोगाच्या या निर्णयाला स्थगिती देण्याची शिवसेनेची मागणी.

असे असले तरी आज सुनावणी होऊन काही निर्णय होणार की पुन्हा प्रकरण लांबणीवर पडणार? हे सांगता येत नाही. याशिवाय कोर्टात ऐनवेळी आणखी काही नवे मुद्दे उपस्थित होऊ शकतात.

राज्यात सरकार स्थापन होऊन एक महिना झालेला असतानाही मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आलेला नाही. त्यामुळे आता न्यायालयाच्या निकालानंतर राज्यात मंत्रिमंडळ विस्तार होणार की शिंदे सरकार कोसळणार, याकडेही राज्याचे लक्ष आहे.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts