Gas Price : देशात दिवसेंदिवस महागाई वाढत चालली आहे. अशातच इंधनाच्या किमतीही गगनाला भिडल्या आहेत. सर्वसामन्य जनतेला आता प्रत्येक गोष्टीसाठी नेहमीपेक्षा जास्त पैसे मोजावे लागत आहेत. तसेच एलपीजी गॅसच्या किमतीतही काही दिवसांपूर्वी कमालीची वाढ केली आहे.
या वाढणाऱ्या किमती कमी व्हाव्यात यासाठी नागरिक आंदोलन करत आहेत. तरीदेखील किमती कमी होतील असे जनतेला वाटत नाही. अशातच आता सर्वसामान्य जनतेसाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण सरकार गॅसच्या किमतीबाबत मोठे पाऊल उचलू शकते.
गॅसची किंमत
देशांतर्गत उत्पादित गॅससाठी पैसे भरण्यासाठी दोन सूत्रे असून यापैकी, एक म्हणजे ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन (ओएनजीसी) आणि ऑइल इंडिया लिमिटेड (ओआयएल) सारख्या राष्ट्रीय पेट्रोलियम कंपन्यांच्या जुन्या फील्डमधून उत्पादित गॅसचे पेमेंट करण्याचे सूत्र आणि दुसरे म्हणजे नवीन क्षेत्रांमधून उत्पादित होणाऱ्या गॅसच्या पेमेंटचे सूत्र.
किमतीत झाली वाढ
रशियाच्या युक्रेनवर आक्रमणानंतर जागतिक ऊर्जेच्या किमतीत वाढ झाली आहे. त्यामुळे आता स्थानिक पातळीवर उत्पादित वायूचे दर विक्रमी उच्चांकावर पोहोचले आहेत. लेगसी किंवा जुन्या फील्डमधून गॅससाठी US$8.57 प्रति दशलक्ष ब्रिटिश थर्मल युनिट (MMBtu) आणि अवघड क्षेत्रांमधून गॅससाठी US$12.46 प्रति MMBtu दर निश्चित करण्यात आला आहे. हे दर पुढच्या महिन्यात म्हणजे 1 एप्रिल रोजी सुधारित केले जातील.
किमतीत बदल होणार
सध्याच्या फॉर्म्युल्यानुसार, जुन्या फील्डमधील गॅसच्या किमती $10.7 प्रति एमएमबीटीयूपर्यंत वाढ होण्याची शक्यता आहे, सूत्रांच्या माहितीनुसार अवघड क्षेत्राच्या गॅसच्या किमतीत थोडा बदल करण्यात येणार आहे. गॅसच्या किमतीतील शेवटच्या सुधारणांनंतर सीएनजी आणि पीएनजीच्या किमती 70 टक्क्यांपर्यंत वाढल्या गेल्या आहेत. जर आता १ एप्रिलपासून दर सुधारित केले तर त्यात आणखी वाढ होईल.
गॅसच्या किमतीत होणार सुधारणा?
सूत्रांनी सांगितले की, सरकारकडून मागच्या वर्षी किरीट पारीख यांच्या अध्यक्षतेखाली स्थानिक ग्राहक आणि उत्पादक यांचे हित साधण्यासाठी तसेच देशाला गॅस आधारित अर्थव्यवस्था बनवण्याचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी गॅसच्या किमतीत सुधारणा करण्यासाठी एक समिती स्थापन करण्यात आली होती.
समितीने त्यांच्या शिफारशींमध्ये जुन्या क्षेत्रांना ठराविक कालावधीसाठी गॅसची किंमत सध्याच्या ब्रेंट क्रूड ऑइलच्या 10 टक्के किंमतीत बदल करण्यास सांगितले आहे. आतापर्यंत हे गॅस अधिशेष असलेल्या देशांच्या किंमतींच्या आधारे केले जात होते.
काय आहे तेलाची किंमत?
प्रति युनिट $4 किंमत आणि $6.50 प्रति एमएमबीटीयूच्या कमाल मर्यादेच्या अधीन असणार आहे, असे सूत्रांनी सांगितले आहे. ब्रेंट कच्च्या तेलाची सध्याची किंमत प्रति बॅरल $75 इतकी आहे. अशा परिस्थितीत गॅसची किंमत प्रति एमएमबीटीयू $7.5 असावी, परंतु मर्यादेमुळे इंधनाची किंमत फक्त $6.5 असणार आहे. तसेच या समितीने अवघड क्षेत्रांच्या सूत्रात कोणताही बदल करू नये असे सुचवले आहे.