ताज्या बातम्या

Gautam Adani : ‘या’ व्यक्तीने बिल गेट्स यांना टाकले मागे, बनले जगातील चौथे श्रीमंत

Gautam Adani : गौतम अदानी (Gautam Adani) यांनी मायक्रोसॉफ्टचे (Microsoft) संस्थापक बिल गेट्स (Bill Gates) यांना मागे टाकले आहे. अदानी जगातील चौथे सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहेत. 113 अब्ज डॉलर्स इतकी अदानी यांची एकूण संपत्ती (Property) आहे.

फोर्ब्सच्या (Forbes) अब्जाधीशांच्या निर्देशांकात ही महत्वाची माहिती समोर आली आहे. श्रीमंतांच्या यादीत (Rich list) गेट्स सध्या 102 अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह पाचव्या स्थानावर आहे.

अदानींच्या उडीमागचे कारण म्हणजे

अलीकडेच बिल गेट्स यांनी बिल आणि मेलिंडा गेट्स (Melinda Gates) फाउंडेशनला $20 अब्ज देणगी देण्याची घोषणा केली. त्यानंतर बिल गेट्सची संपत्ती 103 अब्ज डॉलरवर आली आणि अब्जाधीशांच्या यादीत ते एका स्थानाने खाली घसरून पाचव्या स्थानावर आले.

या बदलामुळे गौतम अदानी गेट्सच्या आधीच्या रँक-चौथ्या स्थानावर पोहोचले. फोर्ब्सच्या रिअल टाइम (Forbes Real Time) यादीनुसार, अदानी अब्जाधीशांच्या यादीत 113.9 अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह चौथ्या क्रमांकावर पोहोचला आहे.

अब्जाधीशांच्या यादीत चौथ्या क्रमांकावर असलेल्या अदानी यांची संपत्ती २०२१ च्या सुरुवातीपासून दुप्पट होऊन 113.9 अब्ज डॉलर झाली आहे. अदानीकडे सहा सार्वजनिक कंपन्यांमध्ये भागीदारी आहे ज्या त्यांच्या नावाखाली चालवल्या जातात आणि उर्जा, हरित ऊर्जा, वायू, बंदरे यासह इतर क्षेत्रात काम करतात.

फेब्रुवारीमध्ये अब्जाधीश मुकेश अंबानी यांना मागे टाकत अदानी आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले. 2008 मध्ये 9.3 अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह ते पहिल्यांदा फोर्ब्सच्या जगातील अब्जाधीशांच्या यादीत सामील झाले.

अब्जाधीशांच्या यादीत

गौतम अदानी चौथ्या क्रमांकावर पोहोचले असून, स्पेसएक्स आणि टेस्लाचे मालक एलोन मस्क पहिल्या क्रमांकावर आहेत. त्यांची एकूण संपत्ती $230.4 अब्ज आहे. 148.4 अब्ज डॉलर्ससह फ्रेंच अब्जाधीश बर्नार्ड अर्नॉल्ट दुसऱ्या क्रमांकावर आणि Amazon चे जेफ बेझोस 139.2 अब्ज डॉलर्ससह तिसऱ्या क्रमांकावर आहेत.

या यादीत लॅरी एलिसन 97.3 अब्ज डॉलर्ससह सहाव्या क्रमांकावर आहे.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office