Geranium Farming : जिरेनियम औषधी वनस्पतीची लागवड बनवणार शेतकऱ्यांना मालमाल; वाचा जिरेनियम शेतीची ए टू झेड माहिती

Ahmednagarlive24 office
Published:

Krushi news : मित्रांनो भारतातील कृषी क्षेत्रातील जाणकार लोक शेतकरी बांधवांना (Farmer) काळाच्या ओघात शेती व्यवसायात (Farming) बदल करण्याचा सल्ला देत असतात.

यामध्ये प्रामुख्याने पीकपद्धतीत बदल करावा असा सल्ला कृषी वैज्ञानिक नेहमीच देत असतात. कृषी तज्ज्ञांच्या मते, अतिरिक्त उत्पन्न मिळविण्यासाठी औषधी व सुगंधी वनस्पतींची लागवड करावी.

मित्रांनो अलीकडच्या काळात देशातील शेतकरी बांधव औषधी वनस्पतींची लागवड (Medicinal Plant Farming) करू लागले आहेत. मात्र, अजूनही अपेक्षित अशी औषधी वनस्पतींची शेती भारतात बघायला मिळत नाही.

त्यामुळे औषधी वनस्पतींची मागणी बघता त्यामानाने होणारा पुरवठा खूपच नगण्य आहे. यामुळे औषधी वनस्पतींची शेती शेतकरी बांधवांसाठी विशेष फायदेशीर ठरणार आहे. हीच बाब लक्षात घेऊन आज आपण एका औषधी वनस्पतीच्या शेती विषयी बहुमूल्य माहिती जाणून घेणार आहोत.

मित्रांनो आज आपण जिरेनियम शेती (Geranium farming) विषयी महत्वाची माहिती थोडक्यात जाणून घेऊया. खरं पाहता, आजकाल बाजारात जिरेनियम तेलाला प्रचंड मागणी आहे, त्यामुळे शेतकरी बांधव याची लागवड करून भरपूर नफा कमवू शकतो. मित्रांनो आम्‍ही तुम्‍हाला सांगू इच्छितो की, जिरेनीयमची पाने, देठ आणि फुलांपासून तेल सहज काढता येते.

जिरेनियम शेती साठी आवश्यक शेत जमीन आणि हवामान
मित्रांनो कृषी क्षेत्रातील जाणकार लोकांच्या मते, जिरेनियमची शेतीसाठी भारतातील हवामान आणि शेतजमीन अनुकूल आहे. भारतातील जवळपास सर्व प्रकारच्या हवामानात जिरेनियम लागवड केली जाऊ शकते.

मात्र असे असले तरी कृषी तज्ञाच्या मते, कमी आर्द्रता असलेले सौम्य हवामान जिरेनियम शेतीसाठी सर्वात योग्य असून अशा हवामानात यापासून चांगले उत्पादन मिळवले जाऊ शकते. ज्या प्रदेशात पाऊस हा 100 ते 150 सेंमी असतो अशा भागात जिरेनियम लागवड करावी असा सल्ला दिला जातो.

याशिवाय वालुकामय चिकणमाती असलेली शेतीजमीन आणि बायोमास असलेल्या कोरड्या जमिनीत याची लागवड केल्यास चांगले उत्पादन मिळतं असते. ज्या जमिनीच्या मातीचा pH 5.5 ते 7.5 यादरम्यान असतो अशा जमिनीत याची शेती करावी.

जिरेनियमच्या सुधारित प्रजाती
जिरेनियमच्या प्रमुख प्रजाती अल्जेरियन, Bourbon, इजिप्शियन आणि सिम-पवन या आहेत.

शेतीची पूर्वमशागत
या वनस्पतीची एकदा लागवड केली कि, यापासून दीर्घकालीन उत्पादन घेता येते. म्हणून याची लागवड करताना सुरुवातीच्या टप्प्यात चांगली काळजी घ्यावी लागते. शेतीची पूर्वमशागत देखील व्यवस्थित केली गेली पाहिजे.

यासाठी शेताची दोन ते तीन वेळा नांगरणी केल्यानंतर रोटाव्हेटरने माती बारीक करावी. त्याचबरोबर शेतातील पाण्याचा निचरा होण्यासाठी चांगली व्यवस्था करावी.

रोपे कशी तयार करावीत
आपला देशात याची बियाणे तयार मिळतं नाही, ज्यामुळे याची रोप कलम पद्धतीने तयार केली जातात. रोपे तयार करण्यासाठी, 8 ते 10 सेमी उंच बेड तयार करावे आणि त्यात खत आणि खाद्य घाला.

यानंतर फेब्रुवारी-मार्च किंवा सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात 5 ते 7 गाठी असलेली डहाळी निवडून त्यापासून 10 ते 15 सेमी लांब व पेन्सिल सारख्या जाडीच्या फांद्या कापून घ्याव्यात.

लागवड कशी करायची
आता 45 ते 60 दिवसांनी तयार शेतात 50 सें.मी. X 50 सेमी अंतरावर झाडे लावा. लागवडीपूर्वी झाडावर थिरम किंवा बाविस्टिनची प्रक्रिया करावी जेणेकरून झाडाला बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव होणार नाही.

खत व्यवस्थापन
विशेष म्हणजे, जिरेनियम एक पानेदार पीक आहे. अशा परिस्थितीत पानांच्या योग्य विकासासाठी हेक्टरी 300 क्विंटल शेणखत वापरावे. त्याचबरोबर नत्र 150 किलो, स्फुरद 60 किलो आणि पालाश 40 किलो प्रति हेक्‍टरी या प्रमाणात द्यावे. स्फुरद व पालाशची संपूर्ण मात्रा शेताची शेवटची नांगरणी करताना द्यावी. तर नत्र 30 किलो या प्रमाणात 15 ते 20 दिवसांच्या अंतराने द्यावे.

पाणी व्यवस्थापन
जिरेनियमची रोपे लावल्यानंतर लगेच पहिले पाणी द्यावे जेणेकरून रोपाचा चांगला विकास होईल. यानंतर हवामान व जमिनीनुसार 5 ते 6 दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे. आम्‍ही तुम्‍हाला सांगू इच्छितो की जास्त सिंचन केल्‍याने झाडांमध्‍ये रूट रॉट रोग होऊ शकतो.

काढणी केव्हा केली जाते
पाने परिपक्व झाल्यानंतर 3 ते 4 महिन्यांनी पानांची पहिली काढणी करावी. काढणीच्या वेळी पाने पिवळी किंवा जास्त रस असलेली नसावी.

कमाई
जिरेनियम पिकासाठी हेक्टरी सुमारे 80 हजार रुपये खर्च येतो. त्याच वेळी, यातून सुमारे 2.5 लाख रुपये उत्पन्न मिळू शकते. अशा प्रकारे एक हेक्टरमधून 1 लाख 70 हजार रुपयांचा निव्वळ नफा मिळू शकतो. यामध्ये कमी जास्त असू शकते. निश्चितच जिरेनियम शेती शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरू शकते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe