ताज्या बातम्या

BSNL : फक्त 197 रुपयांच्या रिचार्जमध्ये मिळवा 3GB डेटासह इतर अनेक फायदे, जाणून घ्या प्लॅन

BSNL : रिलायन्स जिओ, वोडाफोन आयडिया आणि एअरटेलप्रमाणे बीएसएनएल ही आघाडीची सरकारी टेलिकॉम कंपनी आहे. कंपनी आपल्या ग्राहकांच्या बजेटचा विचार करून सतत नवनवीन आणि ग्राहकांना जास्त फायदे देणारे प्लॅन्स सादर करत असते.

त्यामुळे या कंपनीच्या ग्राहकांची संख्या खूप जास्त आहे. स्वस्त प्लॅनमुळे कंपनी इतर कंपन्यांना टक्कर देत असते. डेटा, अनलिमिटेड कॉल आणि एसएमएस शिवाय कंपनीच्या या रिचार्ज प्लॅनमध्ये इतर अनेक फायद्यांचा समावेश असतो.असेच कंपनीचे काही प्लॅन्स आहेत पाहुयात सविस्तर.

1198 रुपयांचा रिचार्ज प्लॅन

कंपनीच्या या प्लॅनबद्दल बोलायचे झाले तर या रिचार्जमध्ये तुम्हाला दर महिन्याला 3GB डेटा देण्यात येत आहे. तसेच तुम्हाला व्हॉईस कॉलसाठी 300 मिनिटे, दर महिन्याला 30 एसएमएसही उपलब्ध आहेत. या प्लॅनची वैधता 365 दिवसांसाठी असणार आहे. दर महिन्‍याच्‍या सुरूवातीला हा लाभ दिला जाईल.

439 प्लॅनची खासियत

439 रुपयांच्या या प्रीपेड रिचार्ज प्लॅनमध्ये तुम्हाला अमर्यादित व्हॉइस कॉलिंग देण्यात येत आहे. तसेच यात तुम्हाला एकूण 300 एसएमएस सुविधाही मिळत आहे. त्याची वैधता 90 दिवसांपर्यंत आहे.

परंतु, या रिचार्ज प्लॅनमध्ये कंपनी डेटा ऑफर करत नाहीये. जर तुम्हाला दीर्घ मुदतीच्या वैधतेसह अधिक कॉलिंग हवे असेल तर, हा प्लॅन तुमच्यासाठी जास्त चांगला ठरू शकतो.

जाणून घ्या 197 रुपयांचा रिचार्ज प्लॅन

या प्लॅनबद्दल बोलायचे झाल्यास या रिचार्जमध्ये तुम्हाला दर महिन्याला 3GB डेटा मिळतो. यात व्हॉईस कॉलसाठी 300 मिनिटे आणि यासोबतच दर महिन्याला 30 एसएमएसही उपलब्ध आहेत. या प्लॅनच्या वैधतेबद्दल बोलायचे झाले तर कंपनीचा हा प्लॅन 365 दिवसांसाठी वापरायला मिळत आहे.

जर तुम्हाला 200 रुपयांपेक्षा कमी रिचार्ज करायचे असल्यास तुम्हाला 197 रुपयांचा प्लॅन दिला जात आहे. ज्यात तुम्हाला 100 दिवसांच्या वैधतेसह अमर्यादित व्हॉइस कॉलिंग आणि डेटा देण्यात येत आहे. ज्यामध्ये तुम्हाला दररोज 2GB इंटरनेट डेटा दिला जातोय. यात तुम्हाला 100 एसएमएसही आणि यासोबतच तुम्हाला झिंग अॅपचाही प्रवेश मिळत आहे.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office
Tags: BSNL

Recent Posts