Paytm Cashback : आता जवळपास सर्व व्यवहार हे ऑनलाईन झाले आहेत. त्यामुळे देशात फोनपे, गुगल पे आणि पेटीएमसारख्या प्लॅटफॉर्मचा वापर वाढला आहे. जर पेटीएम वापरत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे.
कारण पेटीएम तुम्हाला कॅशबॅक देत आहे. पेटीएम आपल्या वापरकर्त्यांना सतत कॅशबॅक देत असते. पेटीएमने UPI लाइट सेवा आणली असून तुम्ही आता साइन अप करत असताना या कॅशबॅकचा लाभ घेऊ शकता. तुम्हाला 100 रुपयांचा कॅशबॅक मिळू शकतो.
UPI Lite सेवा, जी मानक UPI ची एक छोटी आवृत्ती असून जी मागच्या वर्षी सप्टेंबरमध्ये नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) कडून लॉन्च करण्यात आली होती. BHIM अॅपमध्ये बर्याच काळापासून उपलब्ध असलेली ही सुविधा आता आपल्या ग्राहकांसाठी पेटीएमने आपल्या प्लॅटफॉर्मचा एक भाग बनवली आहे. ही कंपनी आपल्या ग्राहकांना चांगला कॅशबॅक देत असून UPI Lite हा 200 रुपयांपर्यंतच्या व्यवहारांसाठी उत्तम पर्याय म्हणून ओळखला जात आहे.
एकूण 9 बँकांचा आहे सपोर्ट
पेटीएम अॅपमधील नवीन पर्यायासह, वापरकर्त्याच्या बँक खात्यात एकच एंट्री करण्यात येते. यामुळे बँक स्टेटमेंटमधून प्रत्येक लहान व्यवहार काढून टाकण्यात येतो. या सेवेला कॅनरा बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, एचडीएफसी बँक, इंडियन बँक, कोटक महिंद्रा बँक, पंजाब नॅशनल बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया, युनियन बँक ऑफ इंडिया आणि उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक अशा 9 बँकांचे समर्थन आहे. हे पेमेंट अयशस्वी होणार नाही तसेच त्यावर सहज प्रक्रिया करण्यात येईल असा दावा कंपनीने केला आहे.
अशी सेट करा सुविधा