Free OTT platforms : वोडाफोन आयडिया, एअरटेल, रिलायन्स जिओ आणि बीएसएनलच्या वापरकर्त्यांची संख्या खूप जास्त आहे. इतकेच नाही तर या कंपन्या आपल्या ग्राहकांच्या बजेटचा विचार करून प्लॅनही सादर करत असतात. याचा त्यांना खूप फायदा होतो.
याच टेलिकॉम कंपन्या आपल्या वापरकर्त्यांसाठी वेगवगळ्या ऑफर्स घेऊ येत असतात. अशीच एक ऑफर आयडियाने आणली आहे. कंपनीच्या 151 रुपयांच्या प्लॅनमध्ये तुम्हाला मोफत Disney + Hotstar संपूर्ण एक महिना वापरता येणार आहे.
तुम्ही या स्वस्त प्लॅनमध्ये, Vodafone-Idea (Vi) द्वारे मोफत Disney + Hotstar चा लाभ घेऊ शकता. हे लक्षात घ्या की कंपनीचा हा प्लॅन एका महिन्याच्या वैधतेसह येतो मात्र त्यात दैनंदिन डेटा उपलब्ध नाही.
जाणून घ्या या प्लॅनचे फायदे
कंपनीच्या या 151 रुपयांच्या प्रीपेड प्लॅनमध्ये 30 दिवसांच्या वैधतेसह एकूण 8GB डेटा मिळत असून तो एका महिन्यासाठी वैध आहे जो तुम्हाला एकाच वेळी वापरता येऊ शकतो. या प्लॅनच्या इतर फायद्यांबद्दल बोलायचे झाल्यास या प्लॅनमध्ये 3 महिन्यांसाठी Disney + Hotstar सबस्क्रिप्शन उपलब्ध करून दिले जात आहे. तसेच, यामध्ये इतर कोणतेही म्हणजेच कॉलिंग किंवा एसएमएसचे फायदे दिले नाहीत.
ठरेल उत्तम प्लॅन
जर तुम्हाला मोफत Disney + Hotstar तसेच सर्व नेटवर्कवर दैनंदिन डेटा आणि अमर्यादित कॉलिंग हवे असेल तर, तुमच्यासाठी 28 दिवसांची वैधता असलेला 399 रुपयांचा प्लॅन उत्तम आहे. यासह, दररोज 2.5GB डेटा, विनामूल्य अमर्यादित कॉलिंग आणि दररोज 100 एसएमएस उपलब्ध आहेत. हा प्लॅन डिस्ने + हॉटस्टार मोबाईल सबस्क्रिप्शन 3 महिन्यांसाठी ऑफर करत आहे.
399 रुपयांच्या प्लॅनला Vi Hero Unlimited चा भाग बनवले असून म्हणजेच यात दररोज रात्री 12 ते सकाळी 6 पर्यंत अमर्यादित डेटा वापरण्याचा पर्याय आहे. प्लॅन Vi Moviles आणि TV अॅपमध्ये प्रवेश देत असून वापरकर्ते Vi अॅपला भेट देऊन 2GB डेटाचा दावा करू शकतात. या प्लॅनमध्ये वीकेंड डेटा रोलओव्हरची सुविधा उपलब्ध असून तुमचा उर्वरित डेटा वीकेंडला एकत्रित करण्यात येतो.