PVC Aadhaar Card : आधार कार्ड हे सर्वात महत्त्वाचे कागदपत्र बनले आहे. कारण बऱ्याच कामांसाठी आता आधारचा वापर करण्यात येतो. सरकारी काम असो की खासगी, आधार कार्ड बंधनकारक आहे. अनेकजणांचे आधारकार्ड हरवते, खराब होते किंवा फाटते.
त्यामुळे त्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. जर तुम्हाला तुमचे आधार कार्ड खराब होऊ नये असे वाटत असेल तर तुम्हाला त्यासाठी फक्त 50 रुपये खर्च करावे लागतील, सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुम्ही हे काम घरबसल्या करू शकता. ऑनलाइन ऑर्डर करण्याची पद्धत काय आहे जाणून घ्या.
हे आहेत फायदे
- हे कार्ड पाण्यात किंवा पावसात भिजून खराब होत नाही
- हे कार्ड फाटत नाही
- हे पूर्णपणे मूळ आधार कार्ड असते.
फॉलो करा या सोप्या स्टेप्स
स्टेप 1
- समजा जर तुम्हाला तुमचे जुने आधार कार्ड पीव्हीसी कार्डने बदलायचे असल्यास तुम्हाला सगळ्यात अगोदर UIDAI च्या अधिकृत वेबसाइट http://uidai.gov.i/ वर जावे लागणार आहे.
- त्यानंतर तुम्हाला खाली येऊन पीव्हीसी बेस पर्यायावर क्लिक करावे लागणार आहे.
स्टेप 2
- त्यानंतर तुम्हाला तुमचा 12 अंकी आधार क्रमांक टाकावा लागेल.
- आता स्क्रीनवर दिलेला कॅप्चा कोड टाकावा लागेल.
- यानंतर, तुमच्या नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावर एक वन टाईम पासवर्ड (OTP) येईल, तो टाका.
स्टेप 3
- आता तुमची सर्व माहिती एकदा तपासून तुम्हाला पैसे द्यावे लागतील
- ऑनलाइन मोडद्वारे पेमेंट केले तर, तुम्हाला एक स्लिप मिळेल, ती तुमच्याकडे ठेवा.
- काही दिवसांनी पीव्हीसी आधार कार्ड तुमच्या पत्त्यावर पोहोच होईल.