Ginger : चुकीचा आहार (Wrong Diet), तणाव (Stress) आणि आळशीपणामुळे (Laziness) लोक बर्याच आजाराने त्रस्त आहेत. त्यातील मधुमेह (Diabetes)हा एक आजार आहे. या आजारात रक्तातील साखरेची (Blood Sugar) पातळी वाढते. परिणामी स्वादुपिंडातून (Pancreas) इन्सुलिन संप्रेरक बाहेर पडणे थांबते.
यावर उपाय म्हणून तुम्ही आल्याचा वापर करू शकता. आले (Ginger) हे प्रत्येक स्वयंपाकघरात असल्यामुळे तुम्ही त्याचे सेवन केलेच पाहिजे,आले हे मधुमेह असणाऱ्या रुग्णांसाठी (Patient) हे वरदानच आहे.
आल्याचे सेवन मर्यादित प्रमाणात करा
काही अहवालांमध्ये असा दावा करण्यात आला आहे की मधुमेहाच्या रुग्णांनी रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यासाठी आले मर्यादित प्रमाणात सेवन करावे. जर तुम्ही दिवसातून 4 ग्रॅम आले खाल्ले तर ते रक्तातील साखरेची पातळी कमी करण्यास आणि इन्सुलिनचे उत्पादन नियंत्रित करण्यास मदत करू शकते.
याशिवाय जास्त प्रमाणात सेवन केल्यास छातीत जळजळ, जुलाब किंवा पोटाचा त्रास होऊ शकतो.
आल्याचे हे फायदेही तुम्हाला मिळतील
ज्या लोकांना मायग्रेनचा (Migrane) खूप त्रास होतो ते देखील याचे सेवन करू शकतात. यामुळे तुमच्या वेदनांचा फायदा होईल. विशेषत: कच्च्या आल्याचे सेवन केल्याने तुम्हाला अधिक लाभ मिळेल.
कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यासाठीही आले खूप फायदेशीर आहे. म्हणजेच हृदयविकाराचा धोकाही यामुळे कमी होईल. तुम्ही चहासोबतही वापरू शकता. किंवा कोणत्याही भाजीत वापरू शकता.