ताज्या बातम्या

दहा मुलं जन्माला घाला, १३ लाख मिळवा; या देशात महिलांना ऑफर

Russia News :कोरोनाकाळात आणि यु्क्रेनसोबत सुरू असलेल्या युद्धात असंख्य रशियन नागरिकांना जीव गमवावा लागला आहे.

त्यामुळे लोकसंख्या कायम राखण्यासाठी तेथील सरकारने ‘मदर हिरोईन’ नावाने एक योजना सुरू केली आहे.यानुसार रशियात ज्या महिला १० मुलांना जन्म देतील त्या महिलांना १३५०० रुबल्स दिले जाणार आहेत, रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी ही घोषणा केली आहे.

अर्थात यावरून तेथे वादंगही सुरू झाले आहे. रशियात कोरोना महामारीत लाखो नागरिकांचा मृत्यू झाला. त्यानंतर महामारी संपताच युक्रेनसोबत सुरू झालेल्या युद्धात रशियन सैनिकांसह ५० हजार लोकांना आपला जीव गमवावा लागला.

त्यामुळे आता ही योजना जाहीर करण्यात आली आहे. त्यानुसार दहा मुलं जन्माला घालणाऱ्या महिलेला दहाव्या मुलाच्या पहिल्या वाढदिवसानिमित्त संबंधित महिलांच्या खात्यात रक्कम वर्ग करण्यात येईल.

मात्र, याला विरोध सुरू झाला आहे. रशियन डॉक्टर म्हटले आहे की, राष्ट्राध्यक्षांनी घेतलेला हा निर्णय निराशा आणि हतबलता दर्शवतो,

रशियाची लोकसंख्या कमी झाल्याची बाब जरी सत्य असली तरी १९९० पासून रशियात लोकसंख्यावाढीसाठी प्रयत्न केले जात आहेत, रशियात आर्थिक,

सामाजिक आणि राजकीय समस्या असताना केवळ १३५०० रुबल्समध्ये दहा मुलांचं पालनपोषण कसं केलं जाऊ शकतं? ते कुठे राहणार आहेत?, असेही सवाल त्यांनी उपस्थित केले आहेत.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts