अहमदनगर Live24 टीम, 21 ऑगस्ट 2021 :- कितीही त्रास झाला तरीघरच्याघरी तात्पुरते उपचार करण्याची सवय आता बदलणे गरजेचे आहे हे गेल्या काही दिवसात कोव्हिड विषाणूच्या अनुभवातून लक्षात आले आहे. स्वत:चे आरोग्य उत्तम हीच खरी संपत्ती हे सर्वांना क्ले आहे .
म्हणूनच सध्याची परिस्थिती पाहता दरवर्षी आरोग्य तपासणी गरजेची असून हाडांची कॅल्शीयम तपासणी तर अत्यावश्यकच असल्याचे मत आ.संग्राम जगताप यांनी सिटीकेअर हॉस्पिटल मध्ये व्यक्त केले.
सिटीकेअर रुबी हॉल क्लिनिक प्रा.ली.आयोजित हाडांची मशीनद्वारे सवलतीच्या दरात कॅल्शीयम तपासणी शिबिर व मशीनचा उद्घाटन सोहळा मा.आमदार संग्रामभेय्या जगताप यांच्या शुभहस्ते संपन्न झाला.
यावेळी ते म्हणाले की,कोरोना काळात सिटीकेअर हॉस्पिटलने कमी खर्चात दिलेली तत्पर सेवा अनेकांनी अनुभवली असून हजारो रुग्ण व नातेवाईकाचे आशीर्वाद यांना लाभले आहेत.सुरवातीपासूनच डॉ.सुराणा यांनी रुग्ण सेवा धोरण स्वीकारून केलेले कार्य मौलिक असून समाज त्यांच्या कार्याची दखल घेईल यात शंकाच नाही.
कार्यक्रमास सामजिक कार्यकर्ते सुहासभाई मुळे,डॉ.संदीप सुराणा,डॉ.कुंदा धुळे,जनसंपर्क अधिकारी किरण बोरुडे व मान्यवर उपस्थित होते. प्रास्ताविकात डॉ.सुराणा यांनी सांगितले की,हाडांच्या दुखण्याच्या आजाराचे प्रमाण वाढत असून वेदनाशामक गोळ्या घेऊन तात्पुरते बरे वाटते पण आजार बरा होत नाही.
त्यासाठी हाडांमधील कॅल्शीयम प्रमाण योग्य असणे गरजेचे आहे.ते जास्त झाले तरी व कमी झाले तरी त्रास होणारच त्यासाठी वर्षातून एकदा हाडामधील कॅल्शीयम प्रमाण मशीनद्वारे तपासले पाहिजे.कोरोना काळात उपचार घेतलेल्यांना हाडांचा त्रास भविष्यात वाडू शकतो .
त्यामुळे सर्वांना योग्य व अल्पदरात सेवा देता यावी यासाठी सिटीकेअर हॉस्पिटलने अत्याधुनिक मशीन कायम स्वरूपी घेतले आहे.दररोज सकाळी ११ ते ५ यावेळेत या मशीनद्वारे हाडांचे कॅल्शीयम तपासणी सवलतीच्या दरात उपलब्ध राहील.
याचा जिल्ह्यातील गरजूनी लाभ घेण्याचे आवाहन त्यांनी केले.तपासणी करणार्यांना आहार व व्यायाम काय करावा याचेही मार्गदर्शन केले जाईल असेही डॉ.सुराणा यांनी सांगितले. प्रास्ताविक व सूत्रसंचालन किरण बोरुडे यांनी केले व करिश्मा शेख हिने आभार मानले.