ताज्या बातम्या

Goat Farming: मोदी सरकार शेळीपालन करण्यासाठी देणार तब्बल ‘इतकं’ लोन; पशुपालकांना मिळणार याचा फायदा

अहमदनगर Live24 टीम, 10 एप्रिल 2022 Modi Government :  शेती समवेतच शेती पूरक व्यवसाय म्हणून पशुपालनाकडे (Animal Husbandry) शेतकरी बांधव वळू लागले आहेत. आपल्या राज्यातही मोठ्या प्रमाणात शेतकरी बांधव (Farmer) आता पशुपालन करू लागले आहेत.

पशुपालनात सर्वात जास्त आता शेतकरी बांधव शेळीपालन (Goat Farming) करत असल्याचे बघायला मिळत आहे. इतर पशू संगोपनाच्या तुलनेत शेळीपालन (Goat Rearing) अधिक सोपे आणि कमी खर्चिक असल्यामुळे शेतकरी बांधवांना शेळीपालन विशेष पसंत पडत आहे.

केंद्र सरकार (Modi Government) व राज्य सरकार (Thackeray Government) देखील शेळीपालन करणाऱ्या पशुपालकांना प्रोत्साहित करण्यासाठी वेगवेगळ्या योजना कार्यान्वित करत असते.

एवढेच नाही बँकासुद्धा शेळी पालन करणाऱ्या पशुपालकांना आता कर्ज (Banking Loan) उपलब्ध करून देत आहेत. शेळीपालन सर्वात जास्त बोकड उत्पादित करण्यासाठी केले जाते अर्थातच मांसासाठी शेळीपालन मोठ्या प्रमाणात केले जाते.

असे असले तरी मध्यंतरी शेळीच्या दुधाची देखील मोठी मागणी बघायला मिळाली होती. मुंबई,पुणे,दिल्ली सारख्या मोठ्या मेट्रो सिटी मध्ये डेंगूच्या साथीत शेळीच्या दुधाला विक्रमी दर मिळत होता.

यामुळे शेळीपालन मांस तसेच दुधासाठी मोठ्या प्रमाणात केले जात असते. असे सांगितले जाते की शेळीपालनात डबल फायदा मिळत असतो आणि या व्यवसायात खर्च देखील अतिशय नगण्य आहे.

मित्रांनो आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की, शेळीपालन व्यवसायासाठी दोन प्रकारे कर्ज (Bank Loan For Goat Farming) मिळू शकते.

व्यवसाय कर्ज ऑपरेशन्स आणि इतर बकरी होल्डिंगसाठी कार्यरत भांडवल कर्ज. एक व्यवसाय कर्ज आणि एक तारण कर्ज याद्वारे संबंधितांना 50,000 ते 10 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज मिळू शकते.

याशिवाय शेळीपालन व्यवसायासाठी विविध बँकां देखील 26 लाखांपर्यंतचे कर्ज देत असतात. यासाठी आपणास जवळच्या बँकेशी संपर्क साधावा लागणार आहे.

एवढेच नाही शेतकरी बांधव शेळीपालन व्यवसायासाठी मोदी सरकारच्या मुद्रा योजनेअंतर्गत कर्ज घेऊ शकतात. यामध्ये बँकांच्या मदतीने MUDRA बिगर कृषी क्षेत्रात गुंतलेल्या व्यक्ती आणि उद्योगांना सेवा आणि उत्पादन क्षेत्रातील उत्पन्न वाढवणाऱ्या उपक्रमांसाठी 10 लाख रुपयांपर्यंत कर्ज देण्याची तरतूद आहे.

त्यासाठी देखील आपण आपल्या जवळच्या बँकेशी संपर्क साधून संपूर्ण तपशील जाणून घेऊ शकता अथवा आपण ऑनलाइन याविषयी माहिती प्राप्त करू शकता.

Ahmednagarlive24 Office

Recent Posts