ताज्या बातम्या

शहर सहकारी बँकेतही सोने तारण घोटाळा, गुन्हा दाखल

Ahmednagar News:नगर अर्बन मल्टीस्टेट-शेड्युल्ड बँकेतील पाच कोटीच्या बनावट सोने तारण घोटाळ्यानंतर आता शहर सहकारी बँकेमध्येही असाच घोटाळा उघडकीस आला आहे.

बँकेच्या पॅनेलवरील गोल्ड व्हॅल्युअरने तिघांच्या मदतीने हा २७ लाखांचा घोटाळा केल्याचा गुन्हा कोतवाली पोलिसांनी दाखल केला आहे. बँकेचे व्यवस्थापक दिनेश कुलकर्णी यांनी फिर्याद दिली आहे.

बँकेच्या पॅनेलवरील गोल्ड व्हॅल्युअर अजयकिशोर कपाले (रा. बालिकाश्रम रोड), विशाल संजय चिपाडे (रा. चिपाडे मळा सारस नगर), ज्ञानेश्‍वर रतन कुताळ (रा.चिपाडे मळा, सारसनगर) व सुनील ज्ञानेश्‍वर अळकुटे (रा. तपोवन रोड) यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

या आरोपींनी कट रचून बनावट सोन्याव्यतिरिक्त इतर धातूच्या वस्तू तयार करुन या खरे सोने आहे असे भासवून ही फसवणूक केल्याचा आरोप आहे.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts