Gold Price Update : दररोज सोन्याच्या किमतीत बदलत होत असतात. हे लक्षात घ्या की दिवसातून दोनवेळा सोन्याच्या किंमतीत बदल होतो. सराफा बाजारात सकाळी आणि संध्याकाळी नव्याने बदललेल्या किंमती जाहीर केल्या जातात. लग्नसराईला लवकरच सुरुवात होणार आहे.
त्यापूर्वी सोने आणि चांदी खरेदी करणाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. कारण सराफा बाजारात सोन्याच्या किमती कमी झाल्या आहेत. तसेच चांदीच्या किमतीही कमळीच्या घसरल्या आहेत. त्यामुळे खरेदी करण्यापूर्वी सोने आणि चांदीच्या किमती जाणून घ्या.
दरम्यान सोने आणि चांदीच्या किमतीत मागच्या काही आठवड्यांपासून सतत वाढ होत आहे. दीर्घ काळासाठी, मागच्या व्यावसायिक आठवड्यात सोने तसेच चांदीच्या दरात घसरण नोंदवली गेली होती. मागच्या आठवड्यात सोन्याचा भाव 750 रुपये प्रति 10 ग्रॅम तर चांदीचा भाव 2800 रुपयांनी कमी झाला. त्यामुळे आता लग्नसराईच्या हंगामात आज सराफा बाजारात सोने आणि चांदीच्या किमतीकडे सगळ्यांचे लक्ष आहे.
आज जाहीर होणार नवीन किमती
आजपासून नवीन व्यावसायिक सप्ताह सुरू होत असून शेवटच्या व्यापारी आठवड्यात सराफा बाजारात सोने आणि चांदीच्या दरात कमालीची वाढ झाली होती. त्यामुळे आज सोने आणि चांदीची वाटचाल कशी होते याकडे सगळ्यांचे लक्ष आहे.
शेवटच्या व्यापार आठवड्याच्या दिवशी हा होता दर
शेवटच्या व्यापार आठवड्याच्या पाचव्या आणि शेवटच्या दिवशी, सोने प्रति 10 ग्रॅम 559 रुपयांनी स्वस्त होऊन 57038 रुपये प्रति किलोवर बंद झाले होते. तर गुरुवारी शेवटच्या व्यवहाराच्या दिवशी सोने 59 रुपये प्रति 10 ग्रॅम वाढून 57597 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाला.
तसेच चांदीच्या किमतीत कमालीची घसरण नोंदवली. चांदीचा भाव 743 रुपयांनी घसरून 66740 रुपये प्रति किलोवर बंद झाला. तर गुरुवारी चांदीचा दर 33 रुपयांनी घसरून शेवटच्या व्यवहाराच्या दिवशी 67483 रुपये प्रति किलोवर बंद झाला.
जाणून घ्या नवीनतम किमती
या तेजीनंतर 24 कॅरेट सोने 559 रुपयांनी स्वस्त होऊन 57038 रुपयांवर, 23 कॅरेट सोने 556 रुपयांनी स्वस्त होऊन 56810 रुपयांवर, 22 कॅरेट सोने 512 रुपयांनी स्वस्त होऊन 52247 रुपयांवर, 18 कॅरेट सोने 419 रुपयांनी स्वस्त होऊन 42779 रुपयांवर आणि 14 कॅरेट सोने 559 रुपयांनी स्वस्त होऊन 33367 रुपये प्रति 10 ग्रॅमवर व्यवहार करत आहे.
स्वस्त होत आहे सोने आणि चांदी
सोने त्याच्या आतापर्यंतच्या उच्चांकापेक्षा 1844 रुपये प्रति 10 ग्रॅमने स्वस्त होत आहे. या अगोदर म्हणजे 2 फेब्रुवारी 2022 रोजी सोन्याने सर्वकालीन उच्चांक गाठलेला होता. त्या दिवशी सोन्याची किंमत 58882 रुपये प्रति दहा ग्रॅमच्या पातळीवर होती. तर चांदी अजूनही 13240 रुपये प्रति किलो दराने त्याच्या सर्वोच्च पातळीपेक्षा स्वस्त आहे. चांदीचा आतापर्यंतचा उच्चांक 79980 रुपये प्रति किलो इतका आहे.