Gold Price Today: ग्राहकांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. या लग्नसराईत ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. भारतीय सराफ बाजारात आज सोन्याचा किमतींमध्ये मोठी घसरण पहिला मिळाली आहे.
आज भारतीय सराफ बाजारात सोन्याचा भाव 270 रुपये प्रति 10 ग्रॅमने कमी झाले आहे तर चांदीच्या दरात देखील घसरण झाली आहे. आज चांदी प्रति किलो 705 रुपयांनी कमी झाली असल्याची माहिती HDFC सिक्युरिटीने दिली आहे.
सोने आणि चांदीची नवीन किंमत
सराफा बाजारात सोन्याचा भाव 270 रुपयांनी घसरून 52,837 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला. मागील व्यवहारात सोन्याचा भाव 53,107 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाला होता. याशिवाय चांदीचा भावही 705 रुपयांनी घसरून 61,875 रुपये प्रति किलोवर बंद झाला. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा भाव 1,752.5 डॉलर प्रति औंस तर चांदीचा भाव 21.30 डॉलर प्रति औंस राहिला.
सोन्या-चांदीचे भाव का पडले?
एचडीएफसी सिक्युरिटीजचे विश्लेषक दिलीप परमार म्हणाले, “मजबूत रुपया आणि गुंतवणूकदारांची जोखीम भूक यामुळे देशांतर्गत सोन्याच्या किमतींवर परिणाम झाला.” ते म्हणाले, डॉलरच्या कमकुवत ट्रेंडमध्ये, नोव्हेंबरमध्ये आतापर्यंत सराफाच्या किमती सुमारे 8% वाढल्या आहेत.
फ्युचर्स मार्केटमध्ये सोने आणि चांदीचे दर
वायदे बाजारात सोन्या-चांदीच्या दरात घसरण झाली आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर डिसेंबर फ्युचर्स सोन्याचा भाव 155 रुपयांनी घसरून 52516 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला. त्याचवेळी डिसेंबर फ्युचर्समध्ये चांदीचा भाव 481 रुपयांनी घसरून 61512 रुपये प्रति किलो झाला.
हे पण वाचा :- 7th Pay Commission: कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी आनंदाची बातमी! खात्यात जमा होणार दोन लाख रुपये; जाणून घ्या संपूर्ण माहिती