Gold Price Today : भारतात सोन्यात गुंतवणूक करणे हा एक चांगला आणि सुरक्षित पर्याय मानला जातो, म्हणून भारतातील बहुतेक लोक सोन्यात त्यांचे पैसे गुंतवतात. परंतु कोणत्याही गोष्टीत आपला पैसा गुंतवण्यापूर्वी आपण त्याबद्दल संपूर्ण माहिती घेणे देखील तितकेच आवश्यक आहे.
जर तुमच्याकडे सोन्याच्या किमतीबद्दल योग्य माहिती नसेल, तर सोने खरेदी करताना तुमचे नुकसान होऊ शकते, त्यामुळे तुमच्याकडे योग्य माहिती असणे आवश्यक आहे. सोन्याच्या किंमतीबद्दल बोलायचे झाले तर देशात कधी सोने स्वस्त होते तर कधी महाग होते, सोने स्वस्त झाले की लोक आनंद व्यक्त करतात.
24 कॅरेट सोन्याची किंमत असते जास्त
भारतात, 18 कॅरेट, 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोने उपलब्ध आहे, 22 कॅरेट सोने 91% शुद्ध आहे आणि उर्वरित 9% तांबे आणि जस्त एकत्र मिसळलेले आहे. 24 कॅरेट सोन्याची शुद्धता 99.9% आहे, तर 24 कॅरेट सोन्याची किंमतही जास्त आहे.
अशा प्रकारे सोन्याचे भाव ठरवले जातात
सोन्याची किंमत मोठ्या प्रमाणावर बाजारात सोन्याची मागणी आणि पुरवठा यावर अवलंबून असते. सोन्याची मागणी वाढल्यास दरही वाढतील. सोन्याचा पुरवठा वाढला तर किंमत कमी होईल. जागतिक आर्थिक परिस्थितीचाही सोन्याच्या किमतीवर परिणाम होतो. उदाहरणार्थ, आंतरराष्ट्रीय अर्थव्यवस्था खराब कामगिरी करत असल्यास, गुंतवणूकदार सुरक्षित गुंतवणूक पर्याय म्हणून सोन्याकडे पाहतील. त्यामुळे सोन्याच्या किमतीत वाढ होईल.
सोन्याची शुद्धता कशी ओळखावी
(इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन फॉर स्टँडर्डायझेशन) सोन्याची शुद्धता ओळखण्यासाठी इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन फॉर स्टँडर्डायझेशनद्वारे हॉल मार्क्स दिले जातात. 24 कॅरेट सोन्याच्या दागिन्यांवर 999, 23 कॅरेटवर 958, 22 कॅरेटवर 916, 21 कॅरेटवर 875 आणि 18 कॅरेटवर 750 असे लिहिले आहे. बहुतेक सोने 22 कॅरेटमध्ये विकले जाते, तर काही लोक 18 कॅरेट देखील वापरतात. कॅरेट 24 पेक्षा जास्त नाही आणि कॅरेट जितके जास्त असेल तितके सोने शुद्ध असेल.
22 आणि 24 कॅरेट सोन्यामधील फरक काय ?
24 कॅरेट सोने 99.9 टक्के शुद्ध आणि 22 कॅरेट सोने अंदाजे 91 टक्के शुद्ध आहे. 22 कॅरेट सोन्यात तांबे, चांदी, जस्त यासारखे 9% इतर धातू मिसळून दागिने तयार केले जातात. 24 कॅरेट सोने हे सर्वात शुद्ध असले तरी, कृपया लक्षात घ्या की दागिने 24 कॅरेट सोन्याचे बनवले जाऊ शकत नाहीत. त्यामुळे बहुतांश दुकानदार 22 कॅरेटमध्ये सोने विकतात.
भारतातील सोन्याचे भाव
दिवाळीमुळे सर्वांचे लक्ष सध्या सोन्याच्या किमतीकडे लागले असतानाच आंतरराष्ट्रीय बाजारात या मौल्यवान धातूच्या किमतीत झालेल्या घसरणीमुळे भारतातही सोन्याचा भाव सोमवारी २०० रुपयांनी घसरला.काल दिवसअखेरीस सोन्याने प्रति १० ग्रॅम ६२४५० रुपये अशी नोंद केली. शुक्रवारी त्याने ६२६५० रुपयांची नोंद केली होती. चांदीचा भाव मात्र ७५२०० रुपयांवर कायम राहिला आहे.
ह्या कारणामुळे झाले भाव कमी
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेतील बदल आणि त्यांच्या शिखर बँकेचे चलनविषयक धोरणात्मक निर्णय सोन्याच्या दरांवर मोठा परिणाम करतात. या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय बाजारात अमेरिकन डॉलरची किंमत वाढल्यामुळे गुंतवणूकदारांनी मौल्यवान धातूकडे पाठ फिरवली. परिणामी सोन्याने ही घसरण नोंदवल्याचे बाजार तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा भाव
आंतरराष्ट्रीय स्पॉट मार्केटमध्ये सोन्याचा भाव 2000 डॉलर पार केल्यानंतर घसरला आहे. COMEX वर सोन्याचा दर 2000 च्या जवळ आला आहे, जो काल 2010 डॉलरच्या वर गेला होता. चांदीची किंमत देखील थोड्या घसरणीसह $ 23.25 प्रति ऑनवर व्यवहार करत आहे. US FED च्या बैठकीचा परिणाम सराफा बाजारावर दिसून येत आहे. व्याजदरांबाबत निर्णय घेण्यापूर्वी गुंतवणूकदार सावध आहेत.