ताज्या बातम्या

Maruti Suzuki : ग्राहकांसाठी सुवर्णसंधी ! मारुतीच्या ‘या’ कार्सवर मिळत आहे बंपर डिस्काउंट, आत्ताच खरेदी करा

Maruti Suzuki : भारतीय बाजारातील मारुती सुझुकी ही दिग्ग्ज कार उत्पादक कंपनी आहे. कंपनी बाजारात आल्यापासून तिने आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. कंपनी सतत नवनवीन कार लाँच करत असते. तसेच कंपनी आपल्या काही लोकप्रिय कार्सवर खूप मोठी सवलतही देत असते.

अशीच सवलत कंपनी आपल्या काही कार्सवर देत आहे. त्यामुळे जर तुम्ही स्वस्तात कार खरेदी करू इच्छित असाल तर तुमच्यासाठी ही एक सुवर्णसंधी आह. त्यामुळे स्वस्तात शानदार फीचर्स असणारी कार खरेदीची संधी चुकवू नका, या कार कोणत्या आहेत पाहुयात यादी.

मारुती सुझुकी वॅगनआर

मारुती सुझुकी वॅगनआर या कारवर 64,000 रुपयांपर्यंत सूट देत आहे. ही भारतातील आणि मारुतीची सर्वात जास्त विक्री होणारी कार आहे. कंपनी टॉल बॉय हॅचबॅकवर 64,000 रुपयांपर्यंत सूट देत आहे.तर त्याच्या 1-लिटर LXI आणि VXI ट्रिम्सवर 40,000 रुपयांपर्यंत सूट देत आहे. यानंतर, 7 वर्षांपेक्षा कमी किंवा जुन्या वाहनांवर एक्सचेंज ऑफर असल्याने, ही एक अतिशय मजबूत डील ऑफर बनली असून ग्राहक यावर 4,000 रुपयापर्यंत कॉर्पोरेट सूट घेऊ शकतात.

मारुती सुझुकी स्विफ्ट

भारतीय बाजारपेठेतील मारुती सुझुकी स्विफ्ट ही सर्वात लोकप्रिय कार आहे. ही एक प्रीमियम स्पोर्टी हॅचबॅक असून आता कंपनी यावर उत्तम ऑफर देत आहे. VXI, Z, आणि Z+ सारख्या टॉप-लेव्हल्सवर 54,000 रुपयांपर्यंत सूट देण्यात येत आहे.

यात 20,000 रुपयांपर्यंतची एक्सचेंज ऑफर आणि 4,000 रुपयांची सूट मिळत आहे. तर तुम्ही मारुती सुझुकी स्विफ्ट ऑटोमॅटिक वेरिएंट खरेदी करण्याचा विचार करत असल्यास VXI, Z, आणि Z+ ट्रिम्सवर एकूण 34,000 रुपयांची सूट देण्यात येत आहे. स्विफ्टची एंट्री-लेव्हल LXI ट्रिम, जी एकूण 29,000 रुपयांच्या सवलतीसह येत आहे.

मारुती सुझुकी अल्टो K10 आणि S-Presso

कंपनी या कारवर 49 हजार रुपयांपर्यंत सूट देत आहे.कंपनीने मागच्या वर्षी ऑगस्टमध्ये Alto K10 लाँच केली असून कंपनीने पहिल्या महिन्यातच 20,000 हून जास्त युनिट्सची विक्री केली आहे. मॅन्युअल श्रेणी – LXI, VXI आणि VXI+ वर 30,000 रुपयांपर्यंत सूट देत आहे. तर, सीएनजी व्हेरियंटवर 15,000 रुपयांपर्यंत सूट आणि सुमारे 15,000 रुपयांची एक्सचेंज पॉलिसी उपलब्ध आहे.

मारुती सुझुकी सेलेरियो

कंपनीकडून या कारवर 44,000 रुपयांपर्यंत सूट दिली जात आहे. या हॅचबॅकवर एक्सचेंजवर एकूण 25,000 रुपयांची सूट आणि सुमारे 15,000 आणि 4,000 रुपयांची कॉर्पोरेट सूट मिळत आहे. हे लक्षात ठेवा की ही डील मॅन्युअल रेंजवर उपलब्ध असून Celerio Automatic किंवा AMT एक्सचेंज पॉलिसीमध्ये 15,000 रुपयांपर्यंत आणि कॉर्पोरेट डिस्काउंटवर 4 हजार रुपयांपर्यंतचा फायदा उपलब्ध आहे. तर कंपनीच्या CNG व्हेरियंटवर 25 हजार रुपयांची सूट उपलब्ध आहे.

मारुती सुझुकी अल्टो 800

कंपनीकडून या कारवर 38,000 रुपयांपर्यंत सूट देण्यात येत आहे. मारुती सुझुकीची सर्वात स्वस्त कार Alto 800 वर 38,000 रुपयांची सूट मिळत आहे. तर 20,000 रुपयांच्या सूटशिवाय, 15,000 रुपयांपर्यंतची अतिरिक्त एक्सचेंज ऑफर आणि 3,000 रुपयांची कॉर्पोरेट सूट मिळत आहे.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts